कोणत्याही पक्षानं राम कदमांना उमेदवारी देऊ नये - उद्धव ठाकरे

हिंदू दहशतवाद आणि शहरी नक्षलवाद नावाचं संशय पिशाच्च उभं केल्याचाही टोला त्यांनी लगावला

Updated: Sep 5, 2018, 03:52 PM IST

मुंबई : भाजप आमदार राम कदम यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी तिखट शब्दांत समाचार घेतला. राम कदम यांच्यावर मुख्यमंत्र्यांनी कारवाई करण्याची मागणी उद्धव ठाकरेंनी केली. तसंच त्यांना कोणत्याही पक्षानं उमेदवारी देऊ नये, असं आवाहनही उद्धव ठाकरेंनी केलं. राम कदमांसह छिंदम आणि परिचारक यांच्यावर कारवाई करण्याचा पुनरुच्चार उद्धव ठाकरेंनी केला. 

यावेळी त्यांनी नक्षलवादाच्या मुद्यावरून सरकार आणि पोलिसांना न्यायालयात पुरावे सादर करण्याचं आव्हान दिलंय. हिंदू दहशतवाद आणि शहरी नक्षलवाद नावाचं संशय पिशाच्च उभं केल्याचाही टोला त्यांनी लगावला.