मुंबई: भारतीय रिझर्व्ह बँकेने सोमवारी पंजाब आणि महाराष्ट्र सहकारी (पीएमसी) बँकेतून पैसे काढण्याच्या मर्यादेत वाढ केली. त्यामुळे आता खातेधारकांना दिवसाला बँकेतून ४० हजार रुपये काढता येतील. यापूर्वी ही मर्यादा २५ हजार इतकी होती.
काही दिवसांपूर्वी पीएमसी बँकेत मोठा गैरव्यवहार झाल्याचे उघड झाले होते. यानंतर रिझर्व्ह बँकेने पीएमसीवर आर्थिक निर्बंध लादले होते. त्यामुळे पीएमसीला रिझव्र्ह बँकेच्या परवानगीशिवाय कर्ज वितरणाला, नवीन गुंतवणूक करण्याला किंवा निधी मिळवून दायित्व वाढविता येणार नाही. त्याचप्रमाणे नव्याने ठेवी स्वीकारण्याला, तसेच ठेव वठविणे, देणी चुकती करण्याला आणि आपल्या कोणत्याही स्थावर मालमत्ता व संपत्तीची विक्री, हस्तांतरण किंवा अन्य मार्गाने विल्हेवाटीवर बंदी आली आहे.
जॉय थॉमस नाही तर जुनेद; पीएमसी बँकेच्या संचालकाबाबत धक्कादायक माहिती
तसेच सुरुवातीला रिझर्व्ह बँकेने खातेधारकांना दिवसाला केवळ १००० रूपये काढण्याची मुभा दिली होती. मात्र, त्यामुळे अनेक सामान्य नागरिकांची मोठी गैरसोय झाली. तेव्हा रिझर्व्ह बँकेने पहिल्या टप्प्यात ही मर्यादा १० हजार आणि त्यानंतर २५ हजारापर्यंत वाढवली होती. परंतु, तरीही खातेधारकांच्या अडचणी कमी झाल्या नव्हत्या.
पीएमसी बँकेतला पैसा भारतात नाहीच... मग कुठेय तो?
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन मुंबईत आल्या असताना संतप्त खातेधारकांनी त्यांच्यासमोर निदर्शनेही केली होती. त्यावेळी निर्मला सीतारामन यांनी यावर तोडगा काढण्याचे आश्वासनही पीएमसी बँकेच्या ग्राहकांना दिले होते.
Reserve Bank of India enhances withdrawal limit for depositors of Punjab and Maharashtra Cooperative PMC Bank Ltd to Rs 40,000. pic.twitter.com/XQu97wLx7L
— ANI (@ANI) October 14, 2019