लॉकडाऊनसंदर्भातील सर्वपक्षीय बैठकीत नेत्यांनी काय मांडली मतं, वाचा एका क्लिकवर

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली सर्वपक्षीय बैठक झाली.    या बैठकीत कोणकोणत्या नेत्यांनी काय मते मांडली पाहूयात  

Updated: Apr 10, 2021, 07:28 PM IST
लॉकडाऊनसंदर्भातील सर्वपक्षीय बैठकीत नेत्यांनी काय मांडली मतं, वाचा एका क्लिकवर title=

 मुंबई : राज्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा वाऱ्यासारखा प्रसार होत आहे.  राज्याच्या यंत्रणेवर ताण येतोय. रुग्णांसाठी बेड, ऑक्सिजन, औषधांचा तुटवडा भासत आहे. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली सर्वपक्षीय बैठक झाली.  
 या बैठकीत कोणकोणत्या नेत्यांनी काय मते मांडली पाहूयात

उद्धव ठाकरे:

  • कठीण परिस्थितीतुन आपण चाललो आहोत 
  • लॉक डाऊन करण्याची वेळ आली आहे.
  • लॉकडाऊन हा पर्याय नाही पण जगाने तो स्वीकारला आहे.
  • वॅक्सिन दोन्ही डोस घेतल्या नंतर काही व्यक्ती कोरोना पॉस्टिव्ह आढळल्या आहेत या बाबत पंतप्रधान यांच्याशी बोललो
  • देवेंद्र फडणवीसजी काल आपण बैठकीत नव्हता आपल्यासाठी ही बैठक आहे.
  • आता निर्णय घेण्याची वेळ आली आहे.
  • तरुण वर्ग आता जास्त बाधित होतोय
  • आपल्याला एकमुखाने निर्णय घ्यायचा आहे
  • लसीकरणाचा वेग आपण वाढवतोय
  • किमान आठ दिवस कडक निर्बंध लावू
  • सर्वानुमते सांगा काय निर्णय घ्यायचा
  • माझे प्रामाणिक मत कडक लॉकडाऊन चे आहे.
  • प्लॅन तयार करायला एक दोन दिवस लागतील, पण तो पर्यंत काय करायचे.
  • काही लोक गैरसमज पसरवत आहेत, कोरोना हा रोग नाही असे सांगत आहेत
  • लाट थोपवयाची असेल तर कडक निर्बंध गरजेचे.
  • प्लॅन तयार करू कोणाला मदत  करता येईल कोणाला नाही हे पाहू
  • इकडे आड तिकडे विहीर अशी परिस्थिती आहे

--------------

देवेंद्र फडणवीस:

  • आम्हाला निमंत्रित केले या बद्दल धन्यवाद
  • कोरोना वाढतोय यात दुमत नाही
  • रेमेडिसीवर अवस्था बिकट आहे
  • कोरोना चाचणी केल्यावर रिपोर्ट तात्काळ येतील याची व्यवस्था करणे आवश्यक
  • आणखी बेड निर्माण करावे लागतील
  • उद्योग क्षेत्र इतर ठिकाणाहून ऑक्सिजन कसा मिळेल हे पाहावे लागेल
  • निर्बंध असले पाहिजेत पण जनतेचा उद्रेक लक्षात घेतला पाहिजे
  • आम्ही मेलो तरी चालेल पण लॉक डाऊन नको अशी भूमिका आहे. याच आम्ही समर्थन करत नाही
  • राज्यावर ताण आहे हे मान्य, छोटा उद्योजक नोकरदार यांचा विचार व्हावा
  • लोकांची परिस्थिती आपण समजून घेतली पाहिजे
  • आता राजकारण होऊ नये हे आम्हाला मान्य, पण आपण हे सत्ता पक्षातल्या मंत्र्यांनाही सांगा मुख्यमंत्री महोदय
  • त्यांनी उठायचे आणि केंद्राकडे बोट दाखवायचे, त्यामुळे आम्हाला उत्तर द्यावे लागते.
  • आम्ही सर्व प्रकारचे सहकार्य सरकारला करू
  • आपण एक प्लॅन तयार करा आणि लोकांसमोर मांडा
  • लोकांचा उद्रेक होईल,त्यांना मदत मिळणार की नाही हे समजू द्या

-------------------

नाना पटोले:

  • राज्यात आज भयावह परिस्थिती
  • लोकांचे जीव वाचवणे याला प्राधान्य द्यायला हवे

--------------------

बाळासाहेब थोरात:

  • हातावर पोट असणाऱ्याची परिस्थिती कठीण आहे
  • गेल्यावेळी आपण १० लाख जेवणाचे पॅकेट वाटले
  • मृत्यू थांबवण्यासाठी उपाय करायला हवे
  • राजकारण सोडून आज आपण एकत्र 
  • कटू निर्णयाची अंमलबजावणी केली तर कोरोनाची साखळी तुटेल
  • कटू निर्णयाची वेळ आली आहे
  • लॉकडाऊन करावा लागेल.

--------------------

अशोक चव्हाण:

  • ज्यांचं उत्पनाचे साधन रोज च्या व्यवहारावर अवलंबून आहे त्यांचा गरिबांचा विचार करून, लॉकडाऊन निर्बंधांचा विचार करावा, यातून मध्यम मार्ग काढावा.

----------------------

राजेश टोपे:

  • वाऱ्यांच्या वेगाने कोरोना पसरतोय
  • आपण त्यामुळे लसीकरणावर भर दिला पाहिजे
  • आय सी यू आणि व्हेंटिलेटरवर बेड वाढवण्याची आवश्यकता आहे

----------------------
प्रवीण दरेकर:

  • शासन काय करतंय याची माहिती विरोधी पक्षाला मिळावी.
  • व्यापारी उद्योजक यांच्यात लॉकडाऊन बद्दल उद्रेक आहे.
  • मुंबईत काँग्रेसने होर्डिंग लावलेत लॉकडाऊन चालणार नाही. आणि बाळासाहेब थोरात लॉकडाऊनबद्दल बोलत आहेत, त्यामुळे एकवाक्यता दिसत नाही
  • व्यापारी उद्योजक यांना मदत मिळावी
  • केंद्र आणि राज्यात संवाद असावा, ऊनी दुनि काढू नये.

----------------------------

एकनाथ शिंदे:

  • लोकांना अवधी देऊन निर्णय घ्यावा लागेल
  • मागच्या वेळे पेक्षा आता पॉसिटीव्ह व्यक्ती जास्त लोकांना बाधीत करू लागले आहेत
  • आता कठोर निर्णय घेण्याची वेळ आली आहे

( बातमी अपडेट होत आहे )