Anil Ambani यांच्या डगमगत्या साम्राज्याला 'या' दोघांनी सावरलं; कंपनीचा व्यवसाय थेट 20474 कोटींच्या पलिकडे

Anil Ambani यांच्या व्यवसाय विस्तारीकरणावर अनेकजण लक्ष ठेवताना दिसत असून, त्यांना या व्यवसायामध्ये नेमकं कोणामुळं यश मिळालं ही बाब समोर आली आहे.   

सायली पाटील | Updated: Oct 7, 2024, 02:48 PM IST
Anil Ambani यांच्या डगमगत्या साम्राज्याला 'या' दोघांनी सावरलं; कंपनीचा व्यवसाय थेट 20474 कोटींच्या पलिकडे  title=
Reliance Power Share Price two men responsible for Anil Ambanis success

Anil Ambani Business : भारतीय व्यवसाय क्षेत्रामध्ये एकिकडे मुकेश अंबानी यांच्या यशानं अनेकांचेच डोळे दीपतात, तर अनिल अंबानी अर्थात थोरल्या अंबानींच्या या भावाविषयी मात्र भलतीय चर्चा मागील काही काळात पाहायला मिळाली. कारण ठरलं ते म्हणजे अनिल अंबानी यांना व्यवसाय क्षेत्रात मिळालेलं अपयश. 

कोविड महामारीच्या काळात त्यंच्या व्यवसायाच्या डोलाऱ्याला मोठा धक्का बसला. वाईट काळाचा सामना केल्यानंतर आता कुठे अनिल अंबानी यांच्या व्यवसायाची घडी बसताना दिसत आहे. थोडक्यात रुळावरून घसरलेली गाडी आता पुन्हा पूर्ववत होताना दिसतेय. गुंतवणुकदारांचा विश्वास जिंकत  आणि साथीदारांना हमी देत अंबानींचा समुह पुढे जात असून, त्यांच्या मार्केट कॅपमध्येही वाढ होताना दिसत आहे.  

रिलायन्स पॉवरच्या शेअरविषयी सांगावं तर, या शेअरनं 54.25 रुपयांच्या दरानं मागील 52 आठवड्यांमधील मार्केट हाय टच केलं आहे. ज्यामुळं त्यांना आणि त्यांच्या कंपनीला आता आर्थिक स्थैर्य प्राप्त होताना दिसत आहे. इतकंच नव्हे, तर अनिल अंबानी यांच्या रिलायन्स इंफ्रास्ट्रक्चरनं त्यांचं 87 टक्के कर्ज कमी केलं आहे. ज्यामुळं रिलायन्स पॉवरचा मार्केट कॅप 20474 कोटी रुपयांवर पोहोचला आहे. 

अनिल अंबानींच्या यशाचं रहस्य...

रसातळाशी पोहोचलेल्या अनिल अंबानी यांच्या या नव्या भरारीसाठी दुसरंतिसरं कोणी नसून, त्यांची मुलं जय अनमोल अंबानी आणि अंशुल अंबानी यांचा मोलाचा वाटा असल्याचं सांगितलं जात आहे. या दोघांनीही अतिशय साचेबद्ध आखणी आणि समर्पणाच्या बळावर वडिलांना व्यवसायात मोठा आधार देत गुंतवणुकदारांना पुन्हा चांगल्या व्यवसायाची हमी दिली आहे. अंबानींच्या थोरल्या मुलानं व्यवसाय क्षेत्रात आपल्या कमाल अनुभवाच्या बळावर संपादन केलेलं यश पाहता, व्यावसायिकांची ही पुढची पिढी आणि त्यांना मिळणारं यश उल्लेखनीय आहे. 

हेसुद्धा वाचा : समाज, भेदभाव, हरभऱ्याची भाजी अन् आंबेडकर... कोल्हापूरातील राहुल गांधीची 'लंच डेट' चर्चेत; पाहा Video

जय अनमोलची एकूण कमाई 

भारतीय उद्योग विश्वामध्ये अनिल अंबानी यांचा मुलगा जय अनमोल अंबानी यानं फार कमी वयात उल्लेखनीय यश संपादन केलं. 2014 मध्ये रिलायन्स म्युच्युअल फंडपासून कामाची सुरुवात करत त्यानं 2017 मध्ये रिलायन्स कॅपिटलमध्ये एग्‍जीक्‍यूट‍िव डायरेक्‍टर म्हणून पदभार सांभाळला. त्याच्याच प्रयत्नांमुळं जपानच्या निप्पॉन लाईफ असेट मॅनेजमेंटनं रिलायन्समध्ये भागिदारी वाढवली आणि इतरही कंपन्यांनी प्रगतीपथावर वाटचाल सुरू केली. ज्यामुळं त्याची एकूण संपत्ती सध्या 2000 कोटी रुपये इतकी झाली आहे.