मुंबई : Ashish Shelar on Nawab Malik : राष्ट्रवादीचे प्रवक्ते आणि मंत्री नवाब मलिक यांना भाजपने प्रत्युत्तर दिले आहे. मुन्ना यादव, हाजी हराफत यासह अनेक भाजप संबंधित पण त्यांच्यावर गुन्हे दाखल नाहीत. म्हणूनच महामंडळ दिले गेले. मात्र, रियाज भाटी हा आधी काँग्रेसचा पदाधिकारी होता. आता राष्ट्रवादीचाच आहे. रियाज भाटी याला राष्ट्रवादीने सुरक्षित ठिकाणी पळविले आहे, अशी शंका आहे, असा आरोप भाजपचे नेते आमदार आशिष शेलार यांनी केला आहे.
नवाब मलिक यांच्या आरोपानंतर शेलार यांनी प्रतिउत्तर दिले आहे. हायड्रोजन बॉम्बची भाषा करणाऱ्यांना लंवगीही लावता आली नाही. त्यात त्यांचे हात पोळले. मलिक यांची हतबलता घालमेल पुन्हा दिसली. मलिक यांनाच ऑक्सिजन गरज लागणार आहे. मलिक यांनी जी नाव घेतली त्यातून फडणवीस यांचा संबंध थेट काहीच नाही, असे शेलार म्हणाले.
मलिक यांनी संपूर्ण सरकारची यंत्रणा कामाला लावली पण उपयोग झाला नाही. मुन्ना यादव, हाजी हराफत यासह अनेक भाजप संबंधित पण त्यांच्यावर गुन्हे दाखल नाहीत. म्हणूनच महामंडळ दिले गेले. हाजी हारफत, हाजी हैदर यांच्यावर दोन वर्षात एनसी ही दाखल नाही, गुन्हेगारांना राजाश्रय तुम्ही देता, असा आरोप शेलार यांनी यावेळी केला.
इम्रान आसल्म शेख काँग्रेसचा सचिव होता. त्याला अटक केली. काँग्रेससंबंधित होता. आता राष्ट्रवादीचा पदाधिकार आहे. कोणालाही बदनाम करण्याचा प्रयत्न फोटोवरुन करू नका, एक बोट दाखवले तुमच्यावर चार बोट येतील. रियाज भाटी सुरक्षित पळवून ठरवण्याचे काम राष्ट्रवादीने केले नाही ना? सचिन वाझे प्रकरणातही रियाज भाटी नाव आहे. म्हणून पळवले का, असा सवाल शेलार यांनी केला आहे.
नवाब मलिक यांचे मानसिक संतुलन बिघडत आहे. त्यांना हर्बल तंबाखू कमी पडत आहे का? जावाई म्हणणं खरं करण्यासाठी नवाबी पातळी गाठू नका. दोन एसआयटी चौकशी तपास सुरु का, मुद्दाम अल्पसंख्यक समाजातील एका नेत्याचे नाव पुढे याव यासाठी मलिक प्रयत्न करतात का, आदी सवाल शेलार यांनी उपस्थित केले.