मुंबई : Devendra Fadnavis vs Nawab Malik : माझे नाही तर देवेंद्र फडणवीस यांचेच अंडरवर्ल्डशी संबंध आहेत. फडणवीसांनी राजकारणाचे गुन्हेगारीकरण केले आहे, असा गंभीर आरोप राष्ट्रवादीचे प्रवक्ते आणि मंत्री नवाब मलिक यांनी केला आहे. फडणवीसांच्या काळात गुन्हेगारांना पद दिली गेलीत. डॉन दाऊदच्या रियाझ भाटी याच्याशी संबंध आहे. आपण मुख्यमंत्री असताना आपण अंडरवर्ल्डशी संबंधित गुंडांना सरकारी महामंडळाचे अध्यक्ष बनवले, असा हल्लाबोल मलिक यांनी पत्रकार परिषदेत केला. (Devendra Fadnavis, tell me now; Who is Riaz Bhati, Munna Yadav? - Nawab Malik)
नागपूरचा मुन्ना यादव यांच्यावर खंडणी, खुनाचे गुन्हे आहेत, तो फडणवीस यांचा साथीदार आहे. त्याला महामंडळाचे अध्यक्ष केले होते. हैदर आझम याला मौलाना आझाद महामंडळाचे अध्यक्ष केले होते. तो बंग्लादेशातील नागरिकांना मुंबईत वसवण्याचे काम करतो. त्याची दुसरी बायको बांग्लादेशी आहे, असा घणाघात मलिक यांनी फडणवीस यांच्यावर केला.
दरम्यान, याप्रकरणी मालाड पोलीस केस दाखल करत असताना तुम्ही पोलिसांवर दबाव आणून ते थांबवले. फडणवीस यांच्या काळात जमीन मालकांना आणून सगळी जमीन नावावर करून घेतली जात होती. परदेशातून गुंड फोन करत होते आणि पोलीस प्रकरण दाबत होते, असा आरोप मलिक यांनी फडणवीस यांच्यावर केला आहे.
बुधवारी पत्रकार परिषदेत नवाब मलिक म्हणाले, 'देवेंद्र फडणवीस यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या काळात संपूर्ण महाराष्ट्रात वसुलीचे काम झाले. त्यांनी मुन्ना यादव आणि हैदर आझम यांचे पालनपोषण केले आणि त्यांना आश्रय दिला. अंडरवर्ल्डचे लोक गुन्हे करायचे आणि फडणवीस सरकार त्यांना संरक्षण द्यायचे. 'नागपूरच्या गुंड मुन्ना यादवला पद का दिले? बांग्लादेशी हैदर आझम यांना भारतीय नागरिक बनवण्याचे काम फडणवीस यांनी केले आणि त्यांना महामंडळाचे पद दिले. संपूर्ण महाराष्ट्रात संकलनाचे काम तुमच्या (फडणवीस) सांगण्यावरून होत होते की नाही? ते बिल्डरांकडून वसूली करत होती की नाही?, असे मलिक यांनी प्रश्न उपस्थित केले.