रिक्षा-टॅक्सी भाडेवाढीची शक्यता, दरात इतके रुपये वाढ

Rickshaw-taxi fare : आणखी एका दरवाढीचा फटका सर्वसामान्यांना बसणार आहे. महागाईचा भडका उडताना दिसत आहेत. आता रिक्षा-टॅक्सी भाडेवाढीची शक्यता आहे. 

Updated: Apr 21, 2022, 08:44 AM IST
रिक्षा-टॅक्सी भाडेवाढीची शक्यता, दरात इतके रुपये वाढ  title=

मुंबई : Rickshaw-taxi fare : आणखी एका दरवाढीचा फटका सर्वसामान्यांना बसणार आहे. महागाईचा भडका उडताना दिसत आहेत. आता रिक्षा-टॅक्सी भाडेवाढीची शक्यता आहे. पेट्रोल आणि डिझेल तसेच सीएनची यांचे दर वाढल्याने टॅक्सी आणि रिक्षाचे दर वाढविण्याची मागणी करण्यात आले आहे. सीएनजीच्या दरात वाढ होत असल्यानं संघटनांनी मागणी केली आहे. याबाबत आता परिवहन विभागाकडून चाचपणी सुरु आहे.

कालच दाढी करणे आणि केस कापणे तसेच ब्युटी पार्लरच्या दरात वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आता रिक्षा-टॅक्सी भाडेवाढीची शक्यताय. पेट्रोल, डिझेलप्रमाणेच आता सीएनजीही महाग होत आहे. त्यामुळे रिक्षा-टॅक्सी संघटनांनीही भाडेवाढीची मागणी केलीय. रिक्षाचं भाडं 2 ते 3 रुपयांनी वाढवण्याची मागणी संघटनांनी केली आहे. तर टॅक्सी संघटनांनी 5 रुपये भाडेवाढीची मागणी केली आहे. परिवहन विभागानंही यासाठी चाचपणी सुरु केलीय.  याआधी मार्च 2021 मध्ये टॅक्सीची भाडेवाढ करण्यात आली होती.