मलिष्कानं मानले मुंबईकरांचे आभार, 'आणखी ६ गाणी तयार'

 रेडियो जॉकी मलिष्कानं मुंबईकर आणि सर्व माध्यमांनी दिलेल्या पाठिंब्याबद्दल आभार मानले आहेत. मलिष्कानं बीएमसीच्या कारभारावर टीका करणारं गाणं फेसबुक टाकलं. त्यावरून शिवसेनेनं मलिष्कावर टीका केली. बुधवारी तर मलिष्काच्या घरी डेंग्युच्या अळ्या सापडल्याचं पुढे आलं. त्यानंतर बीएमसीनं मलिष्काला नोटीस बजावली.

Updated: Jul 20, 2017, 04:33 PM IST
मलिष्कानं मानले मुंबईकरांचे आभार, 'आणखी ६ गाणी तयार' title=

मुंबई : रेडियो जॉकी मलिष्कानं मुंबईकर आणि सर्व माध्यमांनी दिलेल्या पाठिंब्याबद्दल आभार मानले आहेत. मलिष्कानं बीएमसीच्या कारभारावर टीका करणारं गाणं फेसबुक टाकलं. त्यावरून शिवसेनेनं मलिष्कावर टीका केली. बुधवारी तर मलिष्काच्या घरी डेंग्युच्या अळ्या सापडल्याचं पुढे आलं. त्यानंतर बीएमसीनं मलिष्काला नोटीस बजावली.

ही कारवाई सूडबुद्धीनं होत असल्याचा आरोप भाजप आणि मनसेनं केला. दरम्यान सोशल मी़डियावर मलिष्काचं गाणं चांगलच लोकप्रिय झाल्यानं, पालिका प्रशसानाच्या नियमित कारवाईलाही सूडाचा वास येत असल्या प्रतिक्रिया उमटल्या. त्यामुळे मलिष्कानं न्यूयॉर्कमधून मुंबईकरांचे आभार मानले.