आदित्य ठाकरेंना मंत्रालयात 'रूफटॉप' केबिन, कार्यालय दुरुस्तीचं काम सुरु

मुंबईत रूफटॉप रेस्टॉरंटसाठी पुढाकार घेणाऱ्या पर्यावरण आणि पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांना मंत्रालयातही रूफटॉप केबिन मिळालीय.

Updated: Jan 8, 2020, 10:52 AM IST
आदित्य ठाकरेंना मंत्रालयात 'रूफटॉप' केबिन, कार्यालय दुरुस्तीचं काम सुरु title=

कृष्णात पाटील, झी मीडिया, मुंबई : मुंबईत रूफटॉप रेस्टॉरंटसाठी पुढाकार घेणाऱ्या पर्यावरण आणि पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांना मंत्रालयातही रूफटॉप केबिन मिळालीय. सध्या या केबिनच्या दुरूस्तीचे, रंगरगोटीचे काम सुरू असून ते पूर्ण होण्यासाठी आणखी काही दिवसांचा कालावधी लागणर आहे. या केबिनला लागून मोठा टेरेसही असल्यानं ही केबिन भव्यदिव्य दिसते. तशी ही केबिन पूर्वी राज्यमंत्री मदन येरावार यांची होती, मात्र चांगल्या लोकेशनमुळे ही केबिन आदित्य ठाकरे यांनी घेतल्याचं समजतंय.

मंत्रालयाच्या सातव्या मजल्यावर आदित्य ठाकरेंची ही केबिन आहे. याच मजल्यावर मंत्रिमंडळाच्या बैठका होतात. इतर मंत्र्यांची दालनंही सातव्या मजल्यावर आहेत. आदित्य ठाकरेंना दालन क्रमांक ७१७ देण्यात आलं आहे. आदित्य ठाकरेंच्या केबिनला लागूनच टेरेसदेखील आहे.