सचिन वाझे यांचे पोलीस दलातून पुन्हा एकदा निलंबन

 सचिन वाझे सध्या एएनआयच्या कोठडीत

Updated: Mar 15, 2021, 06:43 PM IST
सचिन वाझे यांचे पोलीस दलातून पुन्हा एकदा निलंबन  title=

मुंबई : सचिन वाझे (Sachin Vaze) याचे पोलीस दलातून (Mumbai Police) पुन्हा एकदा निलंबन झाले आहे. सचिन वाझे सध्या एनआयएच्या  कस्टडीत (NIA  Custody)आहे. त्याला 25 मार्चपर्यंत कस्टडी आहे. अंबानी यांच्या घराजवळ स्फोटके सापडली. त्या केसमध्ये वाझे याला अटक झाली आहे. मुकेश अंबानी यांच्या घराजवळ स्कॉर्पिओ गाडीत स्फोटकं आढळून आल्यानंतर या प्रकरणाचा तपास सुरूवातील सचिन वाझे याच्याकडे सोपवण्यात आला होता. नंतर हे प्रकरण एनआयएकडे सोपवण्यात आलं आहे. अंबानींच्या घरासमोर जी स्कॉर्पिओ सापडलेली, ती कार मनसुख हिरेन यांच्या मालकीची होती. मात्र अचानक त्यांचा मृत्यू झाल्यानंतर हे प्रकरण आणखीनच चिघळलं.

हिरेन यांनी पोलिसांकडे केलेल्या तक्रारीनुसार त्यांची कार अंबानींच्या घरासमोरील स्फोटकं ठेवण्यात आल्याच्या एक आठवड्याआधीच चोरीला गेलेली.

मनसुख हिरेन यांच्या पत्नीनेही दावा केलेला की नोव्हेंबर महिन्यात हिरेन यांनी वाझे यांना SUV दिलेली होती, जी वाझेनी फेब्रुवारी महिन्यात परत केली.

मात्र दहशतवाद विरोधी पथक म्हणजेच एटीएसकडे झालेल्या चौकशीत आपण एसयूव्ही वापरली नसल्याचं वाझे म्हणाले होते.

शुक्रवारी सकाळीच वाझे यांनी अटकपूर्व जामिनासाठी कोर्टात अर्ज केला होता. शिवाय चौकशीसाठी वाझे सहकार्य करत असल्यानं त्यांना अटकेपासून संरक्षण मिळावं अशी विनंतीही वाझेंच्या वकिलांनी केलेली. मात्र न्यायालयाने हे अर्ज फेटाळले.

शनिवारी चौकशीअंती रात्री उशिरा सचिन वाझेला एनआयएच्या पथकाने अटक केली. आणि न्यायालयासमोर त्यांना हजर केलेलं असता २५ मार्चपर्यंत कोठडी सुनावण्यात आली.