VIDEO : सलमान भडकला, सेल्फी घेणाऱ्या चाहत्यासोबत असे केले वर्तन

बॉलिवूडचा 'दबंग' सलमान वादात सापडला आहे. त्याने आपला राग आपल्या चाहत्यावर काढला आहे. 

Updated: Jan 28, 2020, 06:47 PM IST
VIDEO : सलमान भडकला, सेल्फी घेणाऱ्या चाहत्यासोबत असे केले वर्तन title=
(फोटो सौजन्य - व्हिडिओ ग्रॅब, इंस्टाग्राम)

मुंबई : बॉलिवूडचा 'दबंग' सलमान खान (Salman Khan) आपल्या आगामी महत्वाची फिल्म 'राधे'च्या (Radhe) शूटिंगमध्ये व्यस्त आहेत. या चित्रपटाचा दिग्दर्शक प्रभूदेवा आहे. दरम्यानच्या काळात सोशल मीडियावर सलमान खानचा एक व्हि़डिओ जोरादर व्हायरल होत आहे. पुन्हा एकदा सलमान वादात सापडला आहे. त्याने आपला राग आपल्या चाहत्यावर काढला आहे. त्याने चाहत्याचा मोबाईल खेचून घेतला आणि तो न देता पुढे निघून गेला. त्याचे झाले असे की, सलमान विमानतळावरून बाहेर पडत असताना एक चाहता सेल्फी घेण्यासाठी पुढे सरसावला. तो सेल्फी घेत असताना ते सलमानच्या लक्षात आले. सेल्फी घेत असताना त्याच्या हातातील मोबाईल काढून तो रागातच आपल्या सुरक्षा रक्षकांच्या गराट्यात पुढे निघून गेला.

व्हायरल व्हिडिओमध्ये आपण पाहू शकता की, सलमान विमानतळावरुन बाहेर पडत आहे. त्यावेळी तेथे उपस्थित असलेल्या एक चाहता आपल्या मोबाइलवरुन सेल्फी घेण्याचा प्रयत्न करतो. सलमानला ही गोष्ट खटकली. त्याने त्याला थांबविण्याचा प्रयत्न केला आणि तर त्याच्या हातातील मोबाईल काढूनच घेतला. सलमानने खेचून घेतलेला मोबाईल आपल्यासोबत हातात घेऊन पुढे रागात निघून गेला. हा व्हिडिओ सोशलमीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. सलमानच्या या वागण्यामुळे चाहत्याला पुन्हा एकदा नाराज व्हावे लागले आहे. तसेच त्याचा मोबाईलही त्यांना खेचून घेतल्याने चाहता खूप नाराज दिसत आहे. पुढे काय झाले ते या व्हिडियोत दिसत नाही.

दरम्यान, सलमानची नुकतीच फिल्म 'दबंग ३' बॉक्स ऑफिसवर काहीही कमाल करु शकलेली नाही. बॉक्स ऑफिसवर 'दबंग ३' पेक्षा अनेक लोकांनी अक्षय कुमारची फिल्म 'गुड न्यूज'ला पसंती दिली. या सिनेमाने २०० कोटी रुपयांपेक्षा जास्त कमाई केली आहे.

सलमान आपल्या आगामी 'राधे' सिनेमाच्या शूटिंगमध्ये खूप व्यस्त आहे. या सिनेमात सलमान एका पोलीस अधिकाऱ्याची भूमिका साकारताना दिसणार आहे.  'राधे' हा सिनेमा यावर्षी २२ मे रोजी रिलीज होणार आहे. सलमानचा भाऊ सोहेल खान या चित्रपटाची निर्मिती केली आहे.