'शिवसेनेला कुणी शहाणपणा शिकवण्याची गरज नाही' - संजय राऊत

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनानिमित्त अभिवादन करताना माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेला हिंदुत्व आणि स्वाभिमानाची आठवण करून दिली होती.

Updated: Nov 17, 2019, 01:03 PM IST
'शिवसेनेला कुणी शहाणपणा शिकवण्याची गरज नाही' - संजय राऊत title=

मुंबई : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनानिमित्त अभिवादन करताना माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेला हिंदुत्व आणि स्वाभिमानाची आठवण करून दिली होती. स्वाभिमान आणि हिंदुत्वाच्या मुद्यावरून शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीस यांना टोला लगावला आहे. 

आम्ही बाळासाहेबांचे शिवसैनिक आहोत. शिवसेनेला कुणीही शहाणपणा शिकवण्याची गरज नाही. अशी शब्दांत संजय राऊत यांनी टीका केली आहे. तसंच बाळासाहेबांना दिलेलं वचन पूर्ण करणारच, मुख्यमंत्री शिवसेनेचाच होणार असा पुनरुच्चार खासदार संजय राऊत यांनी केला आहे.

शिवसेनेचे राज्यसभेचे खासदार संजय राऊत यांनी आजही आपली टीकेची तोफ डागली आहे. संजय राऊत यांनी विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यापासून आपली वक्व्यांची तोफ धडाडत ठेवली आहे. संजय राऊत यांनी आज माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरही हिंदुत्व आणि स्वाभिमानाच्या मुद्यावर निशाणा साधला आहे.