मेघा कुचिक, झी मीडिया मुंबई : शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांना आज पीएमएलए कोर्टात हजर करण्यात येणार आहे. पत्राचळ पुनर्विकासातील पैशांच्या अनियमिततेप्रकरणी ते ईडीच्या कोठडीत आहे. त्यांचा ईडी कोठडीचा आज शेवटचा दिवस आहे. त्यामुळे त्याांना आज पुन्हा न्यायाधीश एम.जी. देशपांडे यांच्यासमोर हजर करण्यात येणार आहे.
न्यायाााधीश देशपांडे याांनी गेल्या दोन सुनावणीत संजय राऊत याांना ईडीच्या कोठडीत पाठवले होते. त्यामुळे आज न्यायालय संजय राऊत यांची पुन्हा ईडी कोठडीत रवानगी करते की, त्याांना न्यायालयीन कोठडी दिली जाते हे पाहणं महत्त्वाचे ठरणार आहे.
संजय राऊत यांना ईडीने 1 ऑगस्ट रोजी मध्यरात्री अटक केली होती. प्रथम न्यायालयाने संजय राऊत याांना ४ ऑगस्टपर्यंत ईडी कोठडी सुनावली होती. त्यानंतर पुन्हा न्यायालयाने त्यांना ८ ऑगस्टपर्यंत ईडी कोठडी सुनावली. प्रवीण राऊत यांनी पत्राचाळ पुनर्विकास प्रकल्प घेतला मात्र त्यांनी तो प्रकल्प खासगी बिल्डरला विकला. हा एक हजार रुपयांहून अधिकचा घोटाळा आहे.
या घोटाळ्यातून प्रवीण राऊत यांना 112 कोटी रुपये मिळाले. प्रवीण राऊत यांनी या रकमेपैकी एक कोटी 6 लाख राऊत कुटुंबीयांना दिले. नंतर ईडीला संजय राऊत याांच्या चौकशीतून अधिक माहिती मिळाली. प्रवीण राऊत आणि संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांच्यात आणखी एक व्यवहार झाला होता. प्रवीण राऊत यांनी वर्षा राऊत याांच्या बँक खात्यात 1 कोटी 8 लाख रुपये भरले होते.
याशिवाय संजय राऊत यांनी अलिबाग इथे विकत घेतलेल्या जमीन मालकाला एक कोटी 17 लाख रोख रक्कम दिली होती. ईडीला या व्यवहाराबाबत अधिक चौकशीची गरज होती, म्हणूनच त्यांनी गेल्या वेळी संजय राऊत यांची कस्टडी मागितली होती. आता आज पुन्हा संजय राऊत यांना कोर्टात हजर करण्यात येणार आहे.