मुंबई : राज्यातील शिंदे फडणवीस सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार लवकरच करण्याबाबत हालाचली सुरू झाल्याचे समजते. नवीन मंत्री मंडळात भाजपाकडून जुने अनुभवी चेहरांना संधी पुन्हा देण्याचे जवळपास निश्चित झाल्याचे समजते अशी माहिती सूत्रांनी दिली.
भाजपाकडून कदाचित गुजरात पॅटर्न नाही तर जुन्याच चेहऱ्यांना पुन्हा संधी मिळणार आहे. पण 'झी 24 तास'ला सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार भाजपाचे जुने जाणते चेहरे मंत्री मंडळात राहतील अशी माहिती मिळाली आहे.
चंद्रकांत पाटील, सुधीर मुनगंटीवार, गिरीश महाजन, राधाकृष्ण विखे पाटील, संजय कुटे यांच्या नावावर भाजपा पक्ष श्रेष्ठी हिरवा कंदील मिळाल्याच समजते. जुन्या नेत्यांवर पुन्हा विश्वास दाखवत राज्यातील पुढील काळात लोकसभा - विधानसभा तयारी सुरू करण्याचे आदेश भाजपा श्रेष्टीने दिल्या आहेत. शिंदे गटाकडून उदय सामंत, गुलाबराव पाटील, शभुराजे देसाई, संदीपान भुमरे यांचा समावेश मंत्रीमंडळात निश्चित मानला जातो.
विधान भवन हालचाली वाढल्या, अधिवेशन बोलवण्याची तयारी?
विधीमंडळ राजेंद्र भगवत यांनी अधिकाऱ्यांची बोलवली तातडीची बैठकआज दुपारी बारा वाजता तातडीची बैठक बोलवली अधिवेशन कधी होणार याबाबत चर्चा होण्याची शक्यता आहे. विधीमंडळ कामकाज सल्लागार समिती ही पुढील काही दिवसात जाहीर केली जाईल. मंत्री मंडळ विस्तार झाल्यानंतर समिती करणे तसच अधिवेशन लवकरच होणार असल्याचा अंदाज असतो.