'मग शेतकऱ्यांना फसवता कशाला?'

कर्जमाफीची प्रक्रिया राबवताना घाई झाली आणि त्यामुळेच चुका झाल्याची कबुली सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी दिलीय.

Updated: Oct 25, 2017, 07:22 PM IST
'मग शेतकऱ्यांना फसवता कशाला?' title=

मुंबई : कर्जमाफीची प्रक्रिया राबवताना घाई झाली आणि त्यामुळेच चुका झाल्याची कबुली सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी दिलीय. गेल्या 40 वर्षांची खाती आहेत. त्यामुळं एवढं मोठं काम करताना चुका होणारच असंही त्यांनी सांगितलंय. मात्र जनतेचा पैसा वाया जाणार नसल्याचा विश्वास देशमुखांनी व्यक्त केलाय. बँकेत माहिती आली आहे. पण तिथे काही समस्या समोर आल्या आहेत.

अनेक शेतकऱ्यांचे आधार कार्ड नंबर एकच आहेत. त्यामुळे प्रक्रियेला उशीर होत असल्याचंही देशमुखांनी सांगितलं. तर शेतक-यांच्या कर्जमाफीचं श्रेय़ घेण्याची घाई भाजपला नडल्याचा टोला शिवसेना खासदार संजय राऊत यांनी हाणलाय. शेतक-यांना काही देता येत नसेल तर फसवता कशाला असा सवाल शिवसेनेनं केलाय.