'त्या' न्यायाधिशांवर पक्षपाती कारवाई होऊ नये - उद्धव ठाकरे

सर्वोच्च न्यायालयाच्या चार न्यायधिशांनी पत्रकार परिषद घेतली आणि देशभर एकच खळबळ उडाली. त्यानंतर देशभरातील अनेक व्यक्तिंनी न्यायाधिशांच्या कृतीबद्दल प्रतिक्रिया दिल्या. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीही या प्रकरणाबाबत प्रतिक्रीया दिली आहे.

Updated: Jan 13, 2018, 04:32 PM IST
'त्या' न्यायाधिशांवर पक्षपाती कारवाई होऊ नये - उद्धव ठाकरे title=

मुंबई : सर्वोच्च न्यायालयाच्या चार न्यायधिशांनी पत्रकार परिषद घेतली आणि देशभर एकच खळबळ उडाली. त्यानंतर देशभरातील अनेक व्यक्तिंनी न्यायाधिशांच्या कृतीबद्दल प्रतिक्रिया दिल्या. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीही या प्रकरणाबाबत प्रतिक्रीया दिली आहे.

न्यायाधिशांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेवर प्रतिक्रीया देताना उद्धव ठाकरे यांनी, न्यायदेवतेला मुकी बहिरी करण्याचा प्रयत्न करण्यात येतोय. त्या न्यायधिशांचे कौतूक त्यांच्यावर कदाचित कारवाई होईल, मात्र ही कारवाई पक्षपाती होऊ नये असे म्हटले आहे.

पुढे बोलताना ठकरे यांनी म्हटले आहे की, शुक्रवारचा प्रकार अत्यंत धक्कादायक असून आता न्यायव्यवस्थेवर विश्वास ठेवायचा की नाही असा लोकांना प्रश्न पडला आहे. दरम्यान, न्यायाधिश लोया यांच्या वादग्रस्तं मृत्यू प्रकरणावर प्रतिक्रीया देताना न्यायाधीश लोया प्रकरणात चौकशी झाली पाहिजे अशी मागणी करताना कर नाही त्याला डर कशाला असा सवालही त्यांनी विचारलाय.