सरकारच्या वर्षपूर्तीच्या कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांना शरद पवार आणि अजित पवार काय म्हणाले...

महाविकास आघाडीला १ वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने झालेल्या कार्यक्रमात राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार,

Updated: Dec 4, 2020, 12:55 AM IST
सरकारच्या वर्षपूर्तीच्या कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांना शरद पवार आणि अजित पवार काय म्हणाले... title=

मुंबई : महाविकास आघाडीला १ वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने झालेल्या कार्यक्रमात राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मोकळेपणाने आपलं मत व्यक्त केलं. या तीनही नेत्यांच्या भाषणाची बोली हे नक्कीच सांगतेय की, सरकार विचारपूर्वक पावलं टाकतंय, आणि खेळीमेळीच्या वातावरणाने सरकार चाललं आहे. 

यावेळी महाविकास आघाडी साकारणारे आणि राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी आपल्या भाषणात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं कौतुक केलं. ते अबोल असले तरी चतुर असल्याचं मत यावेळी शरद पवार यांनी व्यक्त केली. मुख्यमंत्रीपद दिल्यानंतर शरद पवारांची उद्धव ठाकरे यांच्यासाठी ही आणखी एक शाबासकी असावी.

तर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार जे यापूर्वी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत होते, त्यांनी देखील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं कौतुक केलं आहे. एकीकडे उद्धव ठाकरे हे घरातच बसून आहेत अशी टीका विरोधकाकंकडून होत आहे, मात्र अजित पवार म्हणाले, कोरोनाची माहिती घेऊन, यांनी एवढा अभ्यास केला की,  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आरोग्य मंत्री राजेश टोपे हे अर्धे डॉक्टर झाल्याचं अजित पवार यांनी म्हटलं आहे.

तर दुसरीकडे शिवसेनेत आणि काँग्रेसमध्ये जमेल का? असा प्रश्न सर्वांना पडला होता. मात्र या कार्यक्रमात उद्धव ठाकरे यांनी एक उदाहरण  हमारे लोग आप को सताते तो नही, असं सोनिया गांधी या आपल्याला फोनवर सांगत होत्या, असं उद्धव ठाकरे यांनी या कार्यक्रमात सांगितल्याने महाविकास आघाडीची राजकीय नाती किती घट्ट होत आहेत याची कल्पना येईल.