10 हजारांच्या गुंतवणुकीत वर्षभरात अडीच लाखांची कमाई करुण देणारी शेअर कंपनी कोणती?

या शेअर्समध्ये गुंतवणूक केल्याने गुंतवणूकदारांना तगडा फायदा झालाय.  

Updated: Aug 6, 2021, 06:33 PM IST
10 हजारांच्या गुंतवणुकीत वर्षभरात अडीच लाखांची कमाई करुण देणारी शेअर कंपनी कोणती? title=

Multibagger Stocks 2021 मुंबई : कोरोनाच्या वैश्विक महामारीमुळे अनेकांसमोर रोजागाराचे प्रश्नचिन्ह निर्माण झाले. अनेकांना आपल्या नोकऱ्या गमवाव्या लागल्या. तर उद्योगपती आणि व्यावसायिकांच तर कबरंड मोडलं. पण अशा महामारीतही दिग्गज कंपन्यांच्या शेअर्सच्या तुलनेत स्मॉलकॅप शेअर्सने गुंतवणूकदारांना तगडा फायदा मिळवून दिला आहे. गोपाला पॉलीप्लास्टच्या (Gopala Polyplast)  शेअरने फक्त वर्षभरात गुंतवणूकदारांना 2 हजार 300 पट फायदा मिळवून दिला आहे. तर यातुलनेत सेन्सेक्स (Sensex) फक्त 44.68 टक्के इतकाच राहिला. या वर्षाच्या सुरुवातीपासून गोपाल पॉलीप्लास्टचे शेअरमध्ये 1688 टकक्यांनी वाढ झाली आहे. तर महिन्याभरात 151.17 वाढ झाली आहे. कंपनीचं मार्केट कॅप 121 कोटी रुपये इतकं आहे. ज्या गुंतवणूकादारांनी या शेअरमध्ये वर्षभराआधी 10 हजारांची गुंतवणूक केली, त्यांना आता थेट 2 लाख 30 हजारांचा फायदा झाला आहे. (Shares of Gopala Polyplast made investors investment of 10 thousand became 2 lakhs 30 thousand in a year) 
    
बीएसईवर (Bombay Stock Exchange) आज स्टॉकमध्ये 5 टक्क्यांनी वाढ झाली आहे. त्यामुळे 52व्या आठवड्यात बीएसईचे दर हे 118.25 रुपये इतके झाले आहे. मागील 5 दिवसांमध्ये शेअरमध्ये 27.5 टक्क्यांनी वाढ झाली आहे. तर स्टॉकमध्ये आज 5 टक्क्यांनी अपर सर्किट झाला आहे.  गोपाला पॉलीप्लास्टचं  शेअर 5,  20, 50, 100, आणि 200 दिवसांच्या मूविंग एव्हरेजपेक्षा अधिक आहे.  

प्रमोटर्सची भागीदारी 

जून महिन्याच्या शेवटी प्रमोटरांची भागीदारी ही या फर्ममध्ये एकूण 93.83 इतकी होती. तर पब्लिक शेयरहोलडर्सची भाग हे 7.17 टक्के इतके होते. या कंपनीत बँक ऑफ बडोदा (Bank of Baroda) सर्वात मोठं भागधारक होतं. बीओबीचं भागभांडवल हे 5 टक्के किंवा 5 लाख 12 हजार शेअर्ससह सर्वाधिक होतं. 1,38,833 शेअर असलेले केवळ 3 हजार 682 इतके भागधारक होते, ज्यांच्याकडे 2 लाख रुपयांची वैयक्तिक बचत होती. जून तिमाहीच्या शेवटी 3 विदेशी पोर्टफोलियो गुंतवणूकदारांकडे  23 हजार 369 शेयर्स होते.  

कंपनीची आर्थिक स्थिती

कंपनीचा आर्थिक फायदा झाला आहे. मार्च महिन्याच्या तिमाहीत 491.32 टक्क्यांच्या वाढीसह कंपनीने 17 कोटी 14 लाखांचा निव्वळ नफा मिळवला. हाच नफा मागील वर्षी यावेळेस 4 कोटी 38 लाख रुपये इतका होता. दरम्यान, तिमाहीच्या आधारवर नेट प्रॉफीटमध्ये 65.33 वरुन 49.44 इतकी घट झाली आहे. वार्षिक आधारावर मार्च 2021 या आर्थिक वर्षात नेट प्रॉफीटमध्ये 407 टक्क्यांनी वाढ होऊन 63.62 कोटी रुपये इतके झालं आहे. तर मार्च 2020 या वित्तीय वर्षात 20 कोटी 70 लाखांच आर्थिक नुकसान झालं होतं.    

गोपाला पॉलीप्लास्टने भारतात वोवन लेबल आणि पीपी वोवन बॅगची निर्मिती करते. वोवन बोरोचा वापर हा सिमेंट, उर्वरक, चिनी, रसायन आणि अन्नपदार्थांसारख्या उद्योगात पॅकेजिंगसाठी केला जातो.