ST Workers News : विलिनीकरण आणि पगारवाढीच्या मागणीसाठी राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांनी (ST Employee) संप केला होता. जवळपास सहा महिने हा संप सुरु होता. मविआ सरकारकडून (Mahavikas Aghadi Government) मागण्या मान्य होत नसल्याने आक्रमक झालेल्या संपकरी एसटी कर्मचाऱ्यांनी अचानक राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्या मुंबईतील सिल्व्हरओक (SilverOak) या निवासस्थानी हल्ला चढवला होता. यावेळी संपकरी कर्मचाऱ्यांकडून शरद पवार यांच्या घरावर दगडफेक आणि चप्पलफेक करण्यात आली होती.
अचानक घडलेल्या या घनटेचे राजकीय वर्तुळात चांगलेच पडसाद उमटले होते. या घटनेनंतर तत्कालीन परिवहन मंत्री अनिल परब (Anil Parab) यांनी 119 संपकरी एसटी कर्मचाऱ्यांना बडतर्फ करण्याचे आदेश दिले होते.
बडतर्फ कर्मचाऱ्यांना दिलासा
बडतर्फे करण्यात आलेल्या या कामगारांना शिंदे-फडणवीस सरकारने (Shinde-Fadanvis Government) दिलासा दिला आहे. या कर्मचाऱ्यांना पुन्हा सेवेत घेण्याचे आदेश राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी दिले आहेत. त्यामुळे हे सर्व 118 कर्मचारी पुन्हा सेवेत रूजू होणार आहेत. या निर्णयानंतर एसटी मुख्यालयामध्ये कर्मचाऱ्यांनी जल्लोष साजरा केला.
अॅड. गुणरत्न सदावर्तेंना झाली होती अटक
शरद पवार यांच्या घरावरील हल्ल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या आंदोलकांनी अॅड. गुणरत्न सदावर्ते (Adv. Gunratna Sadavarte) यांचं नाव घेतलं होतं. यानंतर अॅड.गुणरत्न सदावर्ते यांच्यावर आंदोलकांना भडकवल्याप्रकरणी गुन्हा दाखल करत त्यांना अटक करण्यात आली. आता बडतर्फे कर्मचाऱ्यांना नोकरीवर परत घेतल्यानंतर सदावर्ते यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना कष्टकऱ्यांप्रती कळवळा आहे. 118 कर्मचारी डंके की चोटपर कामावर रुजू झालेत, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आशिर्वादाने कर्मचारी सन्मामपूर्वक पुन्हा सेवेत आलेत, असं सदावर्ते यांनी म्हटलंय.