'मेलेल्या विरोधकांनी राजकीय आणि नपुंसकतेवर बोलावं'

राज्यात प्रचाराचा धुराळा उडत असताना शिवसेनेनं विरोधकांवर सामनामधून जोरदार टीका केली आहे.

Updated: Oct 15, 2019, 10:39 AM IST
'मेलेल्या विरोधकांनी राजकीय आणि नपुंसकतेवर बोलावं'

मुंबई : राज्यात प्रचाराचा धुराळा उडत असताना शिवसेनेनं विरोधकांवर सामनामधून जोरदार टीका केली आहे. महाराष्ट्र सरकार निष्क्रिय असल्याची टीका काँग्रेस नेते राहुल गांधींनी केली होती. त्यावरूनच शिवसेनेनं सवाल उपस्थित करत खडेबोल सुनावलेत.

काय लिहिलं आहे 'सामना'मध्ये

'ज्या मुद्द्यांना मुख्यमंत्री फडणवीस वगैरे हात लावत नाहीत, त्या मुद्द्यांना उचलू नये अशी बंधनं विरोधी पक्षांवर कोणीही घातलेली नाहीत. पण काँग्रेस पक्षाचा सेनापतीच युद्धभूमीवरुन पळ काढतो आणि बँकॉकला जाऊन बसतो. त्यामुळे काँग्रेस कार्यकर्ता रणात आणि मनात अशा दोन्ही ठिकाणी पराभूत होताना दिसत आहे. 

महाराष्ट्रात युतीचं सरकार निष्क्रिय आहे, असं गांधी म्हणतात. मग आपण स्वत: किती क्रियाशील आहात, याचाही हिशेब द्या. मेलेल्या विरोधकांनी स्वत:च्या राजकीय व नपुंसकतेवर आधी बोलावं. सरकार निष्क्रिय ठरले असेल, तर त्याचा निर्णय जनताजनार्दन घेईल.', असं सामनामध्ये लिहिण्यात आलं आहे.