शरद पवार हे सहकार चळवळीचे आधारस्तंभ : आनंदराव अडसूळ

 मुंबईत डेक्कन मर्चंट को-ऑपरेटिव्ह बँकेच्या शतकपूर्ती सोहळ्यात अडसूळ बोलत होते. यावेळी व्यासपीठावर शरद पवार हेसुद्धा उपस्थित होते. 

Updated: Apr 22, 2018, 07:31 PM IST
शरद पवार हे सहकार चळवळीचे आधारस्तंभ : आनंदराव अडसूळ title=

मुंबई : शरद पवार हे सहकार चळवळीचे आधारस्तंभ आहेत अशा शब्दांत शिवसेना खासदार आनंदराव अडसूळ यांनी माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवारांवर स्तुतीसुमनं उधळली आहेत. मंत्रीपद असो किंवा नसो कोणतेही प्रश्न तत्परतेने सोडवण्यासाठी पवार पुढाकार घेतात. त्यामुळे सहकार चळवळीला पवारांसारख्या नेत्याची गरज असल्याचे अडसूळ यांनी म्हटलंय. मुंबईत डेक्कन मर्चंट को-ऑपरेटिव्ह बँकेच्या शतकपूर्ती सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर शरद पवार हेसुद्धा उपस्थित होते. तसंच अर्थमंत्री अरुण जेटली काम करतो म्हणतात मात्र करत नाही असंही अडसूळ म्हणालेत.