सत्तेचं समीकरण बदलणं राजकारणाचा भाग - शिवेंद्रराजे भोसले

शिवेंद्रराजे भोसले यांची प्रतिक्रिया

Updated: Nov 27, 2019, 03:17 PM IST
सत्तेचं समीकरण बदलणं राजकारणाचा भाग - शिवेंद्रराजे भोसले title=

मुंबई | सत्तेचं समीकरण बदलणं राजकारणाचा भाग असल्याची प्रतिक्रिया भाजप आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी दिली आहे. सर्वसामान्यांच्या प्रश्नासाठी महाविकासआघाडीची मदत मिळेल अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. भाजपसोबत गेल्याचा कुठलाही पश्चात्ताप होत नसल्याचंही ते यावेळी म्हणाले. 

'भाजपचे १०५ आमदार निवडून आले. महाराष्ट्रात भाजप हाच सर्वात मोठा पक्ष आहे हे वस्तूस्थिती आहे. कामं सरकार असली की गतीने होतात. आता सरकार नाही म्हटलं तर मतदारसंघातील काम करायला संघर्ष करावा लागेल. असं शिवेंद्रराजेंनी म्हटलं आहे.

'येणाऱ्या सरकारने सर्वसामान्यांच्या प्रश्नासाठी सहकार्य द्यावं. शेवटी मतदारसंघाचा विषय माझ्या एकट्याचा नाही. मी राष्ट्रवादीतून बाहेर पडलो. पण सरकार हे जनतेचं असतं. मंत्रीपदासाठी नाही. काही अडचणी होत्या म्हणून हा निर्णय घेतला.'

चौकशीची धमकी देऊन मला पक्षात आणलं गेलेलं नाही. मी विचार करुनच भाजपमध्ये प्रवेश केला होता. असं शिवेंद्रराजे यांनी स्पष्ट केलं आहे.