शिवसेना नेते यशवंत जाधव आता ईडीच्या रडारवर, या प्रकरणात होणार चौकशी

मुंबई महानगरपालिकेचे माजी स्थायी समिती अध्यक्ष शिवसेना उपनेते यशवंत जाधव यांच्या घरी यापूर्वी आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी धाड टाकली होती.

Updated: May 25, 2022, 11:43 AM IST
शिवसेना नेते यशवंत जाधव आता ईडीच्या रडारवर, या प्रकरणात होणार चौकशी  title=

मुंबई : शिवसेना नेते यशवंत जाधव यांच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे. जाधव यांच्या घरी आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी केलेल्या छापेमारीत २ कोटी रोख, लॅपटॉप, तसेच काही महत्वाची कागदपत्रे जप्त केली होती.

सुमारे दोन दिवस चाललेल्या या चौकशीत आयकर विभागाला महत्त्वाची माहिती मिळाली होती. आयकर विभागाच्या चौकशीनंतर आता यशवंत जाधव यांच्यावर ईडीची नजर पडली आहे.

यशवंत जाधव यांनी परदेशात केलेल्या गुंतवणूक प्रकरणात त्यांची ईडीकडून चौकशी होणार आहे. ईडीकडून यशवंत जाधव यांना फेमा कायद्यांतर्गत समन्स वाजवण्यात आल्याची माहिती सुत्रांनी दिलीआहे.