मुंबई : पाणी तुंबले तर मुंबईकरांनो सहन करा, असं धक्कादायक उत्तर महापालिका प्रशासनानं दिलं आहे. मुंबई महापालिका प्रशासनाच्या उत्तराने स्थायी समितीत सारेच अवाक झालेत. नालेसफाईच्या मुद्यावरून स्थायी समितीत सत्ताधारी विरोधक आमनेसामने आले होते. त्यावेळी पर्जन्य जलवाहिनी विभागाचे मुख्य अभियंता विद्याधर खणकर यांच्या अजब उत्तराने सत्ताधारी बॅकफूटवर गेले.
चांगली नालेसफाई झालीय, पाणी तुंबणार नाही असा दावा सत्ताधारी शिवसेना करत असतानाच प्रशासनानं स्थायी समितीसमोर वस्तुस्थिती मांडली. आतापर्यंत पाणी तुंबू नये, म्हणून महापालिकेनं शेकडो कोटी खर्च केले आहेत. पण तरीही यंदा मुंबई तुंबणारच, असे स्पष्ट संकेत महापालिका प्रशासनानं दिले आहेत.