मुंबई विद्यापीठ पेपर तपासणीबाबत धक्कादायक खुलासा

मुंबई विद्यापीठाच्या ऑनलाईन पेपर तपासणीचं गौडबंगाल उघड झालंय. 16 हजार 800 प्राध्यापकांपैकी 3 हजार 700 प्राध्यापकांनी एकही उत्तरपत्रिका तपासली नसल्याचं उघड झालंय. 

Updated: Nov 2, 2017, 05:11 PM IST
मुंबई विद्यापीठ पेपर तपासणीबाबत धक्कादायक खुलासा title=
मुंबई : मुंबई विद्यापीठाच्या ऑनलाईन पेपर तपासणीचं गौडबंगाल उघड झालंय. 16 हजार 800 प्राध्यापकांपैकी 3 हजार 700 प्राध्यापकांनी एकही उत्तरपत्रिका तपासली नसल्याचं उघड झालंय. 
 
जवळपास 25 टक्के प्राध्यापकांनी एकही उत्तर पत्रिका न तपासत असहकार केल्याचं उघड झालंय. अशा प्राध्यापकांची माहिती घेऊनन त्यांच्य़ावर कारवाई कऱण्याचा विचार विद्यापीठ करत आहे.
 

नोव्हेंबरमध्ये होणार विद्यापीठाची परीक्षा

ऑनलाईन पेपर चेकिंगमुळे यावर्षी मुंबई विद्यापीठाचं तोंड यावर्षी चांगलंच पोळलं तरीही नोव्हेंबरमध्ये होणारी विद्यापीठाची परीक्षा ऑनलाईन असेसमेंट पद्धतीनेच होणार आहे. 4 लाख 10 हजार विद्यार्थी या परीक्षेला बसणार आहे. 283 कॅप सेंटर ऑनलाईन तपासणीसाठी असणार आहेत. त्यासाठी आवश्यक असलेलं सॉफ्टवेअरही अपडेट करण्यात आलंय. महत्त्वाचं म्हणजे यावर्षीपासून विद्यार्थ्यांना सप्लिमेंट मिळणार नाही. 40 पानांची मुख्य उत्तर पत्रिकाच पुरेशी आहे अशी भूमिका विद्यापीठाने घेतलीय.