मुंबई : भंडार्याच्या भीषण आग दुर्घटनेनंतर पालिकेच्या अग्निशमन दलाकडून मुंबईत करण्यात आलेल्या नर्सिंग होम आणि हॉस्पिटल्सच्या झाडाझडतीत अग्निसुरक्षा नसलेल्या २१९ खासगी नर्सिंग होम आणि हॉस्पिटल्सना नोटीस बजावण्यात आली आहे. संबंधितांना १२० दिवसांत अग्निसुरक्षेबाबत आवश्यक कार्यवाही करावी लागणार आहे. अन्यथा कायदेशीर कारवाई केली जाणार आहे. खासगी नर्सिंग होम आणि हॉस्पिटल्सच्या अग्निसुरक्षेचा प्रश्नही ऐरणीवर आला आहे.
त्यामुळे ११ जानेवारीनंतर पालिकेच्या अग्निशमन दलाकडून मुंबईतील एकूण ११०९ खासगी नर्सिंग होम-हॉस्पिटल्सच्या अग्निसुरक्षेची तपासणी करण्यात आली.
यामध्ये २१९ खासगी नर्सिंग होम, रुग्णालयांमध्ये अग्निशमन यंत्रणा नसल्याचे समोर आले.
तर १२२ ठिकाणे बंद असल्याचे समोर आले. तर २१३ ठिकाणी अग्निसुरक्षा तैनात असल्याचे निदर्शनास आले. दरम्यान, आगामी काळात मुंबईतील रुग्णालयांची तपासणी सुरूच राहणार असून अग्निसुरक्षा नसलेल्या रुग्णालयांना नोटीस देण्यात येणार असल्याचे पालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले.
नोटीस दिलेल्या संबंधित नर्सिंग होम, हॉस्पिटल्स आणि मॉल्सनी निर्धारित वेळेत अग्निसुरक्षेबाबत कार्यवाही करून पालिकेला कळवले नाही. तर पालिकेच्या कायदा विभागाच्या निर्देशानुसार कठोर कारवाई होणार आहे.
यामध्ये यामध्ये वीज-पाणी कापणे किंवा टाळेबंदीचीही कारवाई होऊ शकते अशी माहिती पालिका प्रशासनाकडून देण्यात आली. महापौरांनी तर अशा रूग्णालयांचे रजिस्ट्रेशन रद्द करण्याची इच्छा व्यक्त केलीय.