Sharaddha Murder Case : श्रद्धा हत्याकांड (Sharaddha Murder Case) प्रकरणी आरोपी आफताब (Aftab Poonawala) याने पोलीस चौकशीत अनेक गोष्टींची कबुली दिलीय. त्यावेळी श्रद्धा वालकरचा मारेकरी आफताब हा अंमली पदार्थांच्या आहारी गेला होता अशी माहिती पोलीस तपासात उघड झालीय. गांजाच्या व्यसनावरूनही आफताब आणि श्रद्धा यांची सतत भांडणं होत असत. तसेच श्रद्धाची हत्या करायची नव्हती पण गांजा ओढल्यामुळे ती अंगावर ओरडली त्यामुळे आपण संतापून तिचा गळा दाबत हत्या केली अशी कबुली त्याने पोलिसांना दिल्याची माहिती आहे. आता या प्रकरणानंतर दिल्ली पोलिसांची टीम मुंबईत दाखल झाली आहे.
दिल्ली, महाराष्ट्रासह संपूर्ण देशाला हादरून सोडणाऱ्या श्रद्धा वालकर हत्याकांडाला (Delhi Shraddha Walkar Murder Case) आता नवं वळण लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे. एका प्लंबरनं श्रद्धा वालकर आणि आफताब पूनावाला यांना एकत्र जिवंत पाहिल्याचं सांगीतलंय. हे दोघे उन्हाळ्यात फ्लॅटवर रहायला आले होते अशी साक्ष या प्लंबरनं दिलीये. दरम्यान आफताबनं ज्या कच-याच्या गाडीत रक्तानं माखलेले कपडे फेकले होते त्या गाडीची ओळख पटल्याची माहितीही पोलिसांनी दिली.
वाचा : श्रद्धाचा जीव घेणाऱ्या नराधमानं Google वर नेमकं काय Search केलं?
आता याच प्रकरणासंदर्भात दिल्ली पोलिसांची 5 अधिकाऱ्यांची टीम मुंबईत (Mumbai) दाखल झाली आहे. श्रद्धाच्या हत्येशी संबंधित बाबी मुंबईतही तपासणार असून दिल्ली पोलिसांचा मुंबईतही तपास सुरू झाला आहे. दरम्यान फॉरेन्सिक पथकाने गुरुवारी आफताब पूनावाला याला त्याच्या फ्लॅटवर नेलं, जिथे त्याने आपली प्रेयसी श्रद्धा वालकरचा गळा दाबून खून केल्यानंतर मृतदेहाचे 35 तुकडे केले.
महत्त्वाची बाब म्हणजे, फॉरेन्सिकला फक्त किचनमध्येच रक्ताचे डाग आढळले आहेत. कारण आफताबने केमिकलच्या सहाय्याने सर्व घऱ स्वच्छ करत डाग मिटवून टाकले होते. आफताबने पोलिसांना मृतदेहाचा एक तुकडा किचनमध्ये ठेवल्याचं सांगितलं होतं. तिथेच फॉरेन्सिकला रक्ताचे डाग आढळले आहेत.
दरम्यान, फॉरेन्सिकला नाल्यात काही हाडं सापडली असून ही श्रद्धाची असावीत असा त्यांचा अंदाज आहे. आफतबाने मृतदेहाची विल्हेवाट लावल्याची ठिकाणं सांगितल्यानंतर ही हाडं सापडली आहेत. जर श्रद्धाचा डीएनए या हाडांशी जुळला तर पोलिसांकडे मोठा पुरावा असेल.