नंदकिशोर चतुर्वेदी भारत सोडून पळाला? ईडीकडून तपास सुरु

श्रीधर पाटणकर यांच्याशी व्यावसायिक संबंध असलेला नंदकिशोर चतुर्वेदी आहे तरी कोण?  

Updated: Mar 23, 2022, 01:57 PM IST
नंदकिशोर चतुर्वेदी भारत सोडून पळाला? ईडीकडून तपास सुरु title=

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या पत्नी रश्मी ठाकरे (Rashmi Thackeray) यांचे बंधू श्रीधर पाटणकर यांच्या मालमत्तेवर काल ईडीने (ED) कारवाई केली. या संपूर्ण कारवाईत नंदकिशोर चतुर्वेदी (Nandkishor Chaturvedy) हे नाव पुढे आलं आहे. 

कोण आहे नंदकिशोर चतुर्वेदी
ठाण्यात शास्त्रीनगर भागात नीलांबरी हा गृहनिर्माण प्रकल्प पुष्पक बुलियन या कंपनीने उभारला आहे. पुष्पक बुलियन कंपनीच्या विरोधात 2017 मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता. या कंपनीची 22 कोटी रुपयांची मालमत्ता ईडीने जप्त केली आहे. या कंपन्यातील काही फंड हे वेगवेगळ्या फर्ममध्ये वळवण्यात आला आहे. ईडीचे अधिकारी यातील डीलर नंदकिशोर चतुर्वेदीपर्यंत पोहोचली.

नंदकिशोर चतुर्वेदीनेच अनेक शेल कंपन्यांच्या मार्फत पैसे वळवल्याचे ईडीच्या चौकशीत समोर आलं आहे. पुष्पक ग्रुपच्या पुष्पक रिअॅलिटी या फर्ममधून नंदकिशोर चतुर्वेदी याच्या खात्यात पैसे पाठवण्यात आले होते. चतुर्वेदीच्या मार्फत त्यानंतर M/s Humsafar Dealer Private Limited या कंपनीने सुमारे 30 कोटी रुपयांचे कर्ज साईबाबा गृहनिर्मिती प्रा. लिमिटेडला दिल्याची माहिती समोर आली आहे.  श्री साईबाबा गृहनिर्मिती प्रायव्हेट लिमिटेड कंपनी ही श्रीधर पाटणकर यांच्या मालकीची आहे.

नंदकिशोर चतुर्वेदी आहे कुठे?
ईडी आता नंदकिशोर चतुर्वेदी याच्या मागावर आहे. पण नंदकिशोर चतुर्वेदी हा गेल्या दहा महिन्यांपासून फरार असल्याची महिती सूत्रांनी दिली आहे. ईडी आणि आयकर विभागाकडून नंदकिशोर चतुर्वेदीचा तपास घेतला जात आहे. श्रीधर पाटणकर आणि नंदकिशोर चतुर्वेदीचा व्यावसायिक संबंध असल्याचं समोर आलं आहे. नंदकिशोर चतुर्वेदी हा भारताबाहेर पळाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. 

नंदकिशोर चतुर्वेदी आणि मुख्यमंत्र्यांचे संबंध काय?
हवाला किंग नंदकिशोर चतुर्वेदी (Nandakishor Chaturvedy) आणि उद्धव ठाकरे यांचे संबंध काय असा सवाल किरीट सोमय्यांनी (Kirit Somaiya) विचारला आहे. 2014 मध्ये आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) आणि रश्मी ठाकरे यांनी तयार केलेली कंपनी नंदकिशोर चतुर्वेदीची कशी झाली असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे.