मुंबई: यंदाचा गणेशोत्सव चांगलाच धुमधडाक्यात साजरा केला जातो आहे. कोरोनाच्या तब्बल दोन वर्षानंतर गणेशोत्सव साजरा होत असल्याने बाप्पाच्या दर्शनाची सर्वांनाच उत्कंठा आहे.
यंदा बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी मुंबईतील सिने कलाकार देखील घराबाहेर पडताना पाहायला मिळतायत. सिने कलाकार एखाद्या मंडळात गेलेत की तिथे त्यांचा सत्कार, शाल, श्रीफळ देण्याचा कार्यक्रम होतो. मात्र एका गायिकेला मंडळाने सत्कार म्हणून नव्हे तर अंग झाकण्यासाठी शाल दिली.
ही घटना आहे मुंबईतील अंधेरीचा राजा गणपणी मंडळाची. या गणेश मंडळात गायिका लिझा मिश्रा बाप्पाच्या दर्शनाला पोहोचली. मात्र बाप्पाच्या दर्शनाला जाताना तिने तोकडे कपडे घातल्याने मंडळाने तिला शाल गुंडाळायला दिली.
मुंबईत भाविकांनी गणपती बाप्पाच्या दर्शनाला येताना शरीर झाकेल एवढे कपडे परिधान करावेत हा मंडळाचा नियम आहे. मात्र लिझाने हा घालून दिलेला मोडल्याने मंडळाकडून तिला रोखण्यात आलं आणि तिला शाल देण्यात आली.
मंडळाकडून लिझाला शाल दिली दिली गेल्यानंतर तिने ती लुंगीसारखी बांधून गणरायाचं दर्शन घेतलं. दरम्यान, आता लिझाचे लुंगीसारखी शाल ओढलेले फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होतायत.
singer lisa sharma stopped at mumbais andhericha raja ganesh pandal asked to cover body