मुंबई : विरारममध्ये तरुणीला रेल्वेतून धक्का देणाऱ्या माथेफिरुचे रेखाचित्र रेल्वे पोलिसांनी तयार केले आहे. तसेच या मधेफिरुचं सीसीटीव्ही फुटेज ही पोलिसांना सापडले आहे.
आता पोलीस या फोटो आणि सीसीटीव्ही फुटेजच्या आधारावर आरोपींचा शोध घेत आहे. विरारमध्ये कोमल चव्हाणला चालत्या लोकलमधून फेकल्याची घटना घडली होती. गुरुवारी रात्री 9.30 वाजण्याच्या सुमारास घडली होती. कोमल कामावरून घरी नालासोपाऱ्याला जात असताना ही घटना घडली.
कोमल महिलांच्या डब्यात बसली होती. ट्रेन सुरु होताच एक अनोळखी व्यक्ती त्या डब्यात चढला आणि कोमलकडे पैसे मागू लागला. तिने पैसे देण्यास नकार दिल्याने त्या अनोळखी व्यक्तीने ट्रेनमधून तिला फेकून दिले होते. तिच्या खंद्याला जबर दुखापत झाली असून खांद्यावर शास्र्क्रिया करण्यात आली आहे.