मुंबई : वर्सोवा बीचवर अनेक छोटी कासवाची पिल्लं आढळून आली. स्वच्छता धूत अफरोज शहा यांना ही कासवाची लहान पिल्लं बाहेर येताना दिसली. तातडीने याची माहिती शहा यांनी वनविभागाला दिली.
वर्सोवा किनाऱ्यावर बऱ्याच वर्षानंतर कासवाचं घर सापडल्यामुळे आनंद व्यक्त करण्यात येतोय. अफरोज शहा हे मागील कित्येक महिन्यापासून वर्सोवा बीचची साफसफाई करत आहेत.
वर्सोवा बीचची योग्य प्रकारे साफसफाई होत असल्यामुळे कासवांची घरं आढळून येतायेत. यापूर्वी वर्सोवा बीचवर मोठ्या प्रमाणात कचऱ्याचे साम्राज्य, प्लास्टिक पिशव्या पहायला मिळायच्या. मात्र आता समुद्र किनाऱ्यावर साफसफाई होत असल्यामुळे कासवाना अंडयासाठी अनुकूल वातावरण निर्माण झालंय.