सचिन वाझेला घेऊन NIA ची मिठी नदीवर, नदीपात्रातून मिळाले इतक्या वस्तू

सचिन वाझेला घेऊन NIA ची मिठी नदीवर पाहणी

Updated: Mar 28, 2021, 07:16 PM IST
सचिन वाझेला घेऊन NIA ची मिठी नदीवर, नदीपात्रातून मिळाले इतक्या वस्तू title=

मुंबई : सचिन वाझेला घेऊन NIA ची मिठी नदीवर पाहणी करण्यासाठी आली होती. यावेळी नदीपात्रातून डिव्हीआर, दोन सीपीयू आणि वाहनाची नंबरप्लेट मिळाली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे.

सचिन वाझे याला NIA ची टीम मिठी नदीवर घेऊन आली होती. NIA कडून क्राईम रिक्रिएशन केलं गेलं. त्याअंतर्गत सचिन वाझेला मिठी नदीजवळ नेल्याचं समजतंय. वाझेनं काही पुरावे मिठी नदीत फेकले होते. त्या पुराव्यांचा पाण्यात उतरुन शोध घेण्यात आला. यावेळी काही इलेक्ट्रॉनिक वस्तू सापडल्याचं दिसतं आहे. 

सूत्रांच्या माहितीनुसार कदाचित हेच ठाण्याच्या सोसायटीमधले किंवा पोलीस मुख्यालयातले डीव्हीआर असण्याची शक्यता आहे. दोन सीपीयू आणि वाहनाची नंबर प्लेटही मिळाली आहे. आता यामधून पुढच्या काही गोष्टीचा उलगडा होतो का, याकडे लक्ष लागलं आहे.

सचिन वझे (Sachin Vaze)ने ज्या ठिकाणी बोट करुन सांगितले त्याच ठिकाणी या सर्व वस्तू मिळाल्या आहेत. एनआयए आता या संपूर्ण वस्तूंची तपासणी करणार आहे. 

झी मीडियाच्या हाती एक सीसीटीव्ही फुटेज लागलं आहे. हे फुटेज विक्रोली भागातील आहे. बंटी रेडियमच्या दुकानातील हे फुटेज आहे. जेथे स्कॉर्पियो कार आणि इनोवा कारचे फेक नंबर प्लेट्स बनवल्या गेल्या होत्या. NIA ने कोर्टात म्हटलं होतं की, रियाज़ या प्रकरणात अप्रूवर बनण्यासाठी तयार आहे.

रियाजवर आरोप आहे की, त्याने स्कॉर्पियो कार प्रकरणात सर्व पुरावे एकत्र केले आणि त्याला नष्ट केले. जेव्हा महाराष्ट्र ATS तपास करत होती. तेव्हा रियाजुद्दीन विक्रोली भागातील नंबर प्लेट बनवणाऱ्या बंटी रेडियम दुकानात गेला आणि तेथून DVR, कंप्यूटर घेऊन निघून गेला. या दुकानाचं मालक तुषार सावंत आहे. CCTV मध्ये रियाजुद्दीन, तुषारला आपल्या सोबत घेऊन जातांना दिसत आहे. जेव्ही झी मीडियाची टीम या दुकानावर पोहोचली तेव्हा हे दुकान बंद होतं.