महाआघाडी सरकार पुढे तारेवरची कसरत, सोनिया गांधी यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ( Uddhav Thackeray) यांची महाविकास आघाडी (Maha Vikas Aghadi) चालवताना तारेवरची कसरत यापुढेही सुरुच राहण्याची चिन्हे दिसत आहेत.  

Updated: Dec 18, 2020, 10:29 PM IST
महाआघाडी सरकार पुढे तारेवरची कसरत, सोनिया गांधी यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र  title=
संग्रहित छाया

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ( Uddhav Thackeray) यांची महाविकास आघाडी (Maha Vikas Aghadi) चालवताना तारेवरची कसरत यापुढेही सुरुच राहण्याची चिन्हे दिसत आहेत. काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या सोनिया गांधी (Sonia Gandhi) यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांना सरकारच्या कामाबाबत काही महत्वाच्या सूचना दिल्याचे काँग्रेसचे प्रदेश प्रभारी एच. के. पाटील यांनी म्हटले आहे. 

महाविकास आघाडीच्या कामाबद्दल चार प्रमुख सूचना केल्या आहेत. किमान समान कार्यक्रमावर भर देण्याचा आग्रह चार प्रमुख गोष्टींवर भर देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. महाविकास आघाडीच्या कामाबाबत काँग्रेस पक्षश्रेष्ठींच्या दिल्लीतून सूचना आज दिल्लीत पत्रकार परिषद घेऊन काँग्रेसने ही माहिती दिली. 

काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश प्रभारी एच. के. पाटील यांच्या परिपत्रकात 'किमान समान कार्यक्रमावरच सरकार चालवा', असे नमुद केल्याचे म्हटले आहे. याबाबत सोनिया गांधी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र दिल्याचे म्हटले आहे. सरकारच्या कामाबाबत उद्धव ठाकरे यांना सूचना करताना किमान समान कार्यक्रमावरच सरकार चालविण्याचे सांगताना दलित, आदिवासी, ओबीसींना जपण्याचे आवाहनही केले आहे.