मुख्यमंत्र्यांच्या भेटीअगोदर सोनू सूदचं मराठीत ट्विट

सोनू सूदवरून राजकारण होतंय 

Updated: Jun 8, 2020, 10:15 AM IST
मुख्यमंत्र्यांच्या भेटीअगोदर सोनू सूदचं मराठीत ट्विट title=

 

मुंबई : मजुरांना आपापल्या गावी पोहोचणाऱ्या सोनू सूदवरून राजकारण पेटलंय. सोनू सूदला 'दत्तक' घेऊन भाजपकडून उत्तर भारतीय व्होटबँकेचे राजकारण केले जात असल्याचं शिवसेना नेते संजय राऊत यांनी म्हटलं. यानंतर राजकारण इतकं पेटलं की सोनू सूदने मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. पण या भेटी अगोदर सोनू सूदने आपल्या ट्विटर अकाऊंटवरून चक्क मराठीत ट्विट केलं. (सोनू सूदच्या मातोश्री भेटीवर संजय राऊतांचा खोचक टोला) 

 

स्थलांतरीत मजूर आणि माझं नातं खूप वर्षांपासूनचं आहे.स्थलांतरीत मजूरांसाठी केलेलं कार्य फक्त एका राज्यापुरतं मर्यादित नाही.काश्मीर ते कन्याकुमारीपर्यंत ज्याने मला मदतीसाठी बोलावले त्याच्यापर्यंत पोहोचण्याचा मी प्रयत्न केला. प्रत्येक राज्याच्या सरकारने माझ्या या कामात सहकार्य केलं, असं ट्विट सोनू सूदने केलं आहे. (सोनू सूदकडे मदतीची मागणी करणारे ट्वीट डिलीट होतायत, हे आहे कारण) 

 

सोनू सूदने आतापर्यंत हजारो मजुरांना त्यांच्या त्यांच्या गावी पोहोचवलं आहे. यामध्ये त्याला अनेक राज्याच्या सरकारने सहकार्य केल्याचं म्हटलं आहे. पण सोनू सूदचं हे ट्विट महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या भेटीपूर्वीच आहे. या अगोदर कधीच सोनू सूदने मराठीत ट्विट केलं नव्हतं. तसेच रविवारचा संपूर्ण दिवस हा सोनू सूदवरून झालेल्या राजकीय वादात केला. हे वाचा : सोनू सूदच्या बचावासाठी भाजपचा पुढाकार... राऊतांना चोख प्रत्युत्तर

 सोनु सूदचे समाजकार्य, भाजप नेत्यांचा पाठींबा तसेच राज्यपालांची भेट या सर्वावर शिवसेना नेते संजय राऊत यांनी संशय देखील व्यक्त केला होता. यानंतर या वादाला सुरूवात झाली. यावर भाजप, मनसेकडून राऊतांवर टीका करण्यात आली. आणि यानंतर सोनू सूदने पालकमंत्री असलम शेख यांच्यासोबत मुख्यमंत्र्यांची भेट घेतली होती. सोनू सूदला 'दत्तक' घेऊन भाजपकडून उत्तर भारतीय व्होटबँकेचे राजकारण- राऊत

सोनू सूदच्या समाजकार्यावरुन आता विविध चर्चा रंगू लागल्या आहेत. देशाच्या कानाकोपऱ्यातील मजुरांनी सोनू सूदकडे मदतीची मागणी केली. सोशल मीडियावर त्याला मदतीसाठी अनेक मेसेज येत होते. पण मदतीची मागणी करणारे हे ट्वीट अचानक डिलीट होऊ लागलेयत. त्यामुळे ट्वीटवरून मदत मागणारे हे नक्की गरजुचं होते ? की कोणी हे करवून घेत होतं ? असा प्रश्न निर्माण झाला आहे.