मुंबई : २०१७ हे वर्ष नोकऱ्यांच्या दृष्टीने खास गेले नाही. देशभरात बेरोजगारीची चर्चा वर्षभर होत राहिली. लाखो तरुण नोकरीसाठी भटकत राहिले.
इंडस्ट्रीवर नोटबंदी आणि जीएसटीचा मारा झाल्याने अनेक नोकऱ्यांवर परिणाम झाला.
दरम्यान तरुणांना २०१८ चे प्लानिंग अशा पद्धतीने करावे लागेल, जेणेकरुन नवी नोकरीच नव्हे तर सध्याच्या नोकरीतही चांगली पगारवाढ होईल. यासंदर्भात आम्ही तुम्हाला याबद्दल सांगणार आहोत.
भलेही आयटी आणि आयटीईएस इंडस्ट्रीवर खूप कठीण काळातून जात आहे, पण २०१८ मध्ये यातील भरती वाढेल. नॉन टेक कंपनी आणि इंडस्ट्रीदेखील आयटी एक्सपर्टची नियुक्ती करत आहेत.
२०१८ मध्ये कंपन्यांचा स्किल्सवर फोकस अधिक असणार आहे. डेटा आधारित प्रोडक्ट संबधात बदल होताना दिसत आहे. त्यामूळे नव्या स्किल्सवर कंपन्यांचा भर असणार आहे.
तुमच्या कंपनीची इच्छा आहे की तुम्ही एका वेळी अनेक गोष्टींमध्ये पारंगत असायला हवेत. कंपनीच्या वेगवेगळ्या गरजा एम्पलॉयीने पूर्ण करायला हव्यात.
तरुणांसाठी आनंदाची बातमी म्हणजे कंपन्या सिनयारीटीवर नाही तर परफॉर्मन्स वर जास्त भर देत आहेत. कामाच्या पद्धती आणि स्वरूप बदलले आहे.
त्यामूळे आधीच्या कंपन्यांमध्ये आलेले अनुभव आता लागू होत नाहीत.
शैक्षणिक प्रगतीपेक्षा तुमच्या कम्युनिकेशवर कंपन्यांचे जास्त लक्ष आहे. मराठीसोबतच इंग्रजीत भाषेवर प्रभुत्व असेल तर अनेक कंपन्याना याची गरज आहे.
कंपन्या स्थानिकांना प्राधान्या देत आहेत. मोठमोठ्या फॅक्टरी, कंपन्या छोट्या गावांमध्येही वसत आहेत.
स्थानिक एम्प्लोयी कमी पगारात जास्त आनंदी होऊन काम करत असल्याचे कंपन्यांच्या निदर्शनास आले आहे. हे एम्प्लोयी जास्त काळ कंपनीसोबत राहत असल्याचेही दिसून येते.
एचआर बायोडेटा बघण्यास कमी वेळ देतात. त्यामूळे तुम्हाला असा बायो डेटा बनवावा लागेल ज्यामध्ये सर्व गोष्टी एचआरला समजतील.
याव्यतिरिक्त स्वत: ला मानसिकदृष्ट्याही मजबूत बनवावे लागेल. सध्या मानसिक ताकदीवर जास्त आव्हाने पार केली जातात.