मुंबई : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचा वाहक, चालक परीक्षेत अजब कारभार उघड झाला आहे. २०१८-१९ या वर्षी झालेल्या परीक्षेच्या निकालात त्रुटी असल्याचं उघड झालंय. ३८ मार्क मिळालेल्या उमेदवाराला पात्र केले आहे, तर ५२ मार्क मिळालेले १४१ उमेदवार मात्र नोकरीपासून वंचित असल्याचे उघड झाले आहे.
सांगली जिल्ह्यातल्या दुष्काळी भागातले हे सर्व वंचित उमेदवार आहेत. परिवहन मंडळाकडे याबाबत विचारणा केली असता सॉफ्टवेअर प्रॉब्लेममुळे हा प्रकार झाल्याचे उत्तर देण्यात आले आहे.
युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांची भेट घेऊन संबंधित उमेदवारांनी निवेदन दिलंय. यावर परिवहनमंत्र्यांसोबत आपली भेट घडवून समस्या सोडवण्यासंबंधी प्रयत्न करण्याचं आश्वासन देण्यात आले आहे.