केंद्रानंतर राज्यातही मंत्रिमंडळ विस्ताराचे संकेत

केंद्राच्या मंत्रिमंडळ विस्ताराची तारीख नक्की झाल्यावर आता इच्छुकांना राज्य मंत्रीमंडळ विस्ताराचे वेध लागलेत. 

Updated: Sep 1, 2017, 04:48 PM IST
केंद्रानंतर राज्यातही मंत्रिमंडळ विस्ताराचे संकेत title=

मुंबई : केंद्राच्या मंत्रिमंडळ विस्ताराची तारीख नक्की झाल्यावर आता इच्छुकांना राज्य मंत्रीमंडळ विस्ताराचे वेध लागलेत. 

पुढच्या आठवड्यात 5 तारखेला अनंत चतुर्दशी आहे आणि त्यानंतर पितृपंधरवडा सुरू होतोय. त्यामुळे या 15 दिवसांत मंत्रीमंडळ विस्तारासारखं महत्त्वाचं पाऊल उचललं जाण्याची शक्यता नाही. 
पितृपक्षानंतर लगेच नवरात्र सुरू होईल. त्यामुळे दसऱ्याच्या मुहूर्तावरच फडणवीस मंत्रिमंडळाचा विस्तार होण्याची शक्यता आहे. 

27 तारखेला भाजपा अध्यक्ष अमित शाह, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांची बैठक झाली होती. यावेळी मंत्रीमंडळ विस्ताराचं सूत्र निश्चित झाल्याची माहिती आहे.