मुंबई शेअर मार्केटमध्ये पडझड, सेन्सेक्स १६०० अंकांनी कोसळला

 कोरोना व्हायरसचे सावट शेअर मार्केटवर कायम दिसून येत आहे. शेअर मार्केटची सुरुवात पडझडीने झाली. 

Updated: Mar 12, 2020, 10:50 AM IST
मुंबई शेअर मार्केटमध्ये पडझड, सेन्सेक्स १६०० अंकांनी कोसळला title=

मुंबई : कोरोना व्हायरसचे सावट शेअर मार्केटवर कायम दिसून येत आहे. आज शेअर मार्केटची सुरुवात पडझडीने झाली. सेन्सेक्स तब्बल ६०० अंकांनी कोसळला. निफ्टीही ५०० अकांनी खाली आला आहे. तर रिलायन्सचा शेअर सुद्धा १०० रुपयांनी कोसळला आहे. विमान कंपन्यांच्या शेअरमध्ये सुद्धा विक्रीची लाट उसळलेली पाहायला मिळत आहे. तर बँकांच्या समभागामध्ये मोठा फटका बसला आहे. एसबीआय, इन्फोसिस, एल अॅण्ड टी, टाटा स्टिल आदी मोठ्या कंपन्यांचे शेअर पाच ते सात टक्क्यांनी घसरले आहेत. त्यामुळे बाजारात मोठी घबराहट कायम असल्याचे दिसून येत आहे.

 

देशातील कोरोना विषाणूचा वाढती धोका आणि सरकारने सर्व पर्यटकांचा व्हिसा रद्द केल्याचा परिणाम शेअर बाजारामध्ये दिसून येत आहे. गुरुवारी सकाळी बाजारात मोठी घसरण झाली. ३० शेअर्सचा निर्देशांक सेन्सेक्स १६०० अंकांच्या कमजोरीसह ३४,००० वर उघडला. त्याचबरोबर नॅशनल स्टॉक एक्सचेंजचा ५० समभागांचा संवेदनशील निर्देशांक निफ्टीदेखील ५३८ अंकाच्या घसरणीसह ९,९६० वर उघडला. 

या शेअरचे मोठे नुकसान

सेन्सेक्समध्ये सध्या एचडीएफसी, नेस्ले इंडिया, हीरो मोटोकॉर्प, कोटक बँक, रिलायन्स इंडस्ट्रीज, बजाज फायनान्स, अ‍ॅक्सिस बँक आणि टाटा स्टील रेड मार्कच्या खाली आहेत. त्याचप्रमाणे निफ्टीमध्ये एशियन पेंट, डॉ. रेड्डी, आयशर मोटर्स, भारती एअरटेल, सिब्ला आणि मारुती सुझुकीची यांच्या समभागांची मोठी घसरण झाली आहे.

कोरोना वायरस का असर: शेयर बाजार गिरावट के साथ खुले, सेंसेक्स 1,600 अंक नीचे

अमेरिकेच्या शेअर बाजारातही घसरण

बुधवारी अमेरिकन शेअर बाजारामध्ये कमालीची घसरण दिसून आली. बेंचमार्क डो जोन्स १४०० हून अधिक अंकांनी घसरला आणि परिणाम हा आशियाई बाजारातही दिसून आला. येथेही मोठी घसरण दिसून आली. सिंगापूर एक्सचेंजमध्ये ४ टक्के घसरण झाली. यामुळे भारतीय शेअर बाजारावरही या परिणाम होईल, अशी शक्यता वर्तविण्यात आली होती.