मुंबई : शहरात असल्फा भागात दरड कोसळल्याने 5 ते 6 घरांचे नुकसान झाले आहे. या दुर्घटनेत दोन जण गंभीर जखमी झाले आहे. घरांवर दरड कोसळल्याची माहिती मिळताच स्थानिक पोलीस, पालिका अधिकारी आणि फायर ब्रिगेड घटनास्थळी दाखल झाले आणि ढिगारा हटवून अडकलेल्यांना बाहेर काढले.
सोमवारी रात्री उशिरा अचानक डोंगराचा काही भाग असल्फा भागात बांधलेल्या घरांवर पडला. या अपघातात 2 लोक गंभीर जखमी झाले, तर 5 ते 6 झोपड्याचे मोठे नुकसाना झाले. घटनेनंतर स्थानिक पोलीस, मुंबई महापालिका अधिकारी आणि कर्मचारी घटनास्थळी पोहोचलेत. तसेच अग्निशमन दलाचे जवान दरड बाजुला करण्याचे काम करत आहेत.
स्थानिक शिवसेनेचे आमदार दिलीप लांडे यांच्या यांनी सांगितले की, मागील वर्षी डोंगराच्या दोन्ही बाजूंना संरक्षक भिंत बांधण्यात आली आहे. तिसऱ्या बाजूला डोंगराची उंची जास्त आहे, त्यामुळे तेथे संरक्षक भिंत बांधता आली नाही. पण येत्या अर्थसंकल्पात ती देखील बनवली जाईल. घटनेनंतर, प्रभावित कुटुंबांना जवळच्या शाळेत स्थलांतरीत करण्यात आले आहेत.