सुप्रीम कोर्टाचा देशमुख आणि मलिक यांना दणका, महाविकासआघाडीला फटका

महाविकासआघाडीला पुन्हा एकदा झटका बसला आहे.

Updated: Jun 20, 2022, 04:31 PM IST
सुप्रीम कोर्टाचा देशमुख आणि मलिक यांना दणका, महाविकासआघाडीला फटका title=

मुंबई : राज्यसभा निवडणुकीनंतर विधानपरिषदेच्या निवडणुकीत ही अनिल देशमुख आणि नवाब मलिक (Nawab Malik and Anil Deshmukh) यांना झटका लागला आहे. सुप्रीम कोर्टाने अंतरिम आदेश देण्यास नकार दिला आहे. त्य़ामुळे अनिल देशमुख आणि नवाब मलिक यांना मतदान करता येणार नाही.

आमदार लोकप्रतिनिधी आहेत.  परंतु ६२(५) रिप्रजेंटेशन ॲाफ पिपल्स ॲक्ट मध्ये स्पष्ट आहे की जे कारागृहात आहेत त्यांना मतदानाला जाता येणार नाही.

कोर्टाच्या या निर्णयानंतर भाजप नेते किरीट सोमय्या यांनी महाविकासआघाडीवर टीका केली आहे. ठाकरे सरकारला आणखी "थप्पड", असं किरीट सोमय्या यांनी म्हटले आहे. 

नवाब मलिक आणि अनिल देशमुख यांना हा मोठा झटका आहे. विधान परिषद निवडणुकीत (Legislative Council Election) त्यांना मतदान करता येणार नाही. याआधी उच्च न्यायालयाने ही त्यांनी (High Court) याचिका फेटाळून लावली होती. 

राष्ट्रवादीची 2 मते कमी झाल्याने महाविकास आघाडीला मोठा झटका बसणार आहे. विधान परिषदेसाठी आज मतदान होत आहे.