सुशांतची एक्स मॅनेजर दिशा सालियनच्या पार्टीचा व्हिडिओ समोर

सुशांतसिंग राजपूतची एक्स मॅनेजर दिशा सालियनच्या पार्टीचा एक व्हिडिओ समोर आला आहे.

Updated: Aug 8, 2020, 07:45 PM IST
सुशांतची एक्स मॅनेजर दिशा सालियनच्या पार्टीचा व्हिडिओ समोर

मुंबई : सुशांतसिंग राजपूतची एक्स मॅनेजर दिशा सालियनच्या पार्टीचा एक व्हिडिओ समोर आला आहे. ही पार्टी दिशाच्या मित्र मैत्रिणींपैकी एकाच्या घरी झाली. हीच पार्टी दिशासाठी शेवटची ठरली असल्याचं बोललं जातंय. या पार्टीनंतरच दिशा सालियनने आत्महत्या केली असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. 

दिशा सालियान ज्या पार्टीमध्ये होती, त्या पार्टीची सध्या चर्चा सुरू आहे. या पार्टीचाच एक व्हिडिओ समोर आला आहे. दिशा सालियान या पार्टीच्या व्हिडिओमध्ये दिसत आहे. तिने स्वत: हा व्हिडिओ बनवल्याचं पाहायला मिळत आहे. पण हा व्हिडिओ नेमका कधीचा आहे? तसंच कुठला आहे? याची तपासणी पोलीस करत आहेत. 

दिशा सालियनच्या पार्टीच्या या व्हिडिओमध्ये ६ जण दिसत आहेत. हे सगळे ६ जण दिशा सालियानचे मित्रच असल्याचं कळतंय. दिशाच्या या मित्रांपैकीच कोणीतरी या पार्टीचं आयोजन केलं होतं. ही पार्टी नेमकी कधी झाली आणि कुठे झाली, याची माहिती अजूनही समोर आलेली नाही.