मोठी बातमी: संजय दत्त लीलावती रुग्णालयात दाखल

त्याची कोरोना चाचणीही करण्यात आली होती. 

Updated: Aug 8, 2020, 11:02 PM IST
मोठी बातमी: संजय दत्त लीलावती रुग्णालयात दाखल

मुंबई: अभिनेता संजय दत्त याला शनिवारी रात्री लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्राथमिक माहितीनुसार, त्याला श्वास घेण्यात त्रास जाणवत असल्यामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आले. यावेळी त्याची रॅपिड कोरोना टेस्टही करण्यात आली. मात्र, या चाचणीचा अहवाल नेगेटिव्ह आला. परंतु, तरीही संजय दत्तला कोरोनाची नक्की लागण झाली आहे किंवा नाही, याची खात्री करण्यासाठी त्याचा स्वॅब तपासणीसाठी पाठवण्यात आला आहे. त्यामुळे आता डॉक्टरांना या रिपोर्टची प्रतिक्षा आहे. 

प्राथमिक माहितीनुसार, सध्या संजय दत्त याला मुख्यत: श्वसनाचा त्रास जाणवत आहे. त्याची ऑक्सिजन लेवल कमी जास्त होत आहे. सध्या त्यादृष्टीने उपचार सुरु आहेत. मात्र, कोरोनाचा अहवाल आल्यानंतरच डॉक्टरांना पुढील उपचारांची ठोस दिशा निश्चित करता येईल.