मुंबई : भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांना ट्रोल करणाऱ्यांवर कारवाई करा, अशी मागणी भाजपने केली आहे. यासाठी भाजपचं शिष्टमंडळ मुंबईचे पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांची भेट घेतली. देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल सोशल मीडियामध्ये अश्लिल आणि आक्षेपार्ह भाषा वापरली जात आहे. बदनामीकारक पोस्ट टाकून फडणवीस आणि भाजप कार्यकर्त्यांना धमकी दिली जात आहे. अश्लिल पद्धतीने ट्रोलिंग करणाऱ्यांवर आणि सोशल मीडियावर गैरसमज पसरवणाऱ्यांवर कारवाई करा, अशी मागणी भाजपने केली आहे.
ज्यापद्धतीने सोशल मीडियावर बदनामी कारक पोस्ट टाकून @Dev_Fadnavis जी, भाजप कार्यकर्त्यांना धमकी दिली जात आहे तसेच अश्लील पद्धतीने ट्रोलिंग व सोशल मीडियावर गैरसमज पसरविणाऱ्यांवर कारवाई करावी यासाठी मुंबई भाजपा शिष्ठ मंडळांने @CPMumbaiPolice पोलीस आयुक्तांची भेट घेऊन निवेदन दिले. pic.twitter.com/Ftoi596tNm
— Adv. Ashish Shelar - ॲड. आशिष शेलार (@ShelarAshish) May 2, 2020
.@Dev_Fadnavis जी यांच्यावर अश्लील व विकृत तसेच धमकी देणाऱ्या पोस्ट टाकणाऱ्यां विरुद्ध कारवाई करावी अशी मागणी पोलीस आयुक्त, मुंबई यांच्याकडे केली. माझ्यासोबत @bjp4mumbai अध्यक्ष आमदार @MPLodha जी, खासदार @iGopalShetty जी, आमदार ॲड. @ShelarAshish जी उपस्थित होते. @BJP4Maharashtra pic.twitter.com/UXeA6whHlx
— Pravin Darekar - प्रविण दरेकर (@mipravindarekar) May 2, 2020
मुंबई पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांची भाजपच्या शिष्टमंडळाने भेट घेतली. हे निवेदन देण्यासाठी विधानपरिषदेचे विरोधीपक्षनेते प्रविण दरेकर, आशिष शेलार, खासदार गोपाळ शेट्टी आणि मंगलप्रभात लोढा उपस्थित होते.
ट्रोल्सच्या जनकांना आज ट्रोल् विरोधात तक्रार करण्याची वेळ येणे हा नियतीचा खेळ आहे. बोया पेंड बबूल का, आम कहांसे खाय?
२०१४ नंतर देशात ट्रोलधाड भाजपाने आणली. आमच्या तक्रारींकडे दुर्लक्ष केले. अजून धर्मांधता भाजपा ट्रोल्स पसरवतात.
तरीही शिवीगाळ,धमक्या असतील तर पोलिसांनी कारवाई करावी— Sachin Sawant सचिन सावंत (@sachin_inc) May 2, 2020
दुसरीकडे काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी या भेटीवरून भाजपवर निशाणा साधला आहे. ट्रोल्सच्या जनकांना आज ट्रोलविरोधात तक्रार करण्याची वेळ येणे हा नियतीचा खेळ आहे. बोया पेड बबूल का, आम कहांसे खाय? २०१४नंतर देशात ट्रोलधाड भाजपने आणली. आमच्या तक्रारींकडे दुर्लक्ष केलं, अजून धर्मांधता भाजप ट्रोल्स पसरवतात, तरीही शिवीगाळ, धमक्या येत असतील, तर पोलिसांनी कारवाई करावी, असं ट्विट सचिन सावंत यांनी केलं आहे.