तानसा जलवाहिनीत बाधितांना मिळाला निवारा

न्यायालयाने महापालिकेचे आदेश रद्द करत या कुटुंबियांना दिलासा दिला आहे.

Updated: Aug 5, 2017, 08:39 PM IST
तानसा जलवाहिनीत बाधितांना मिळाला निवारा title=

मुंबई : तानसा जलवाहिनीत बाधित झालेल्या चारशे कुटुंबियांसांठी आनंदाची बातमी आहे. न्यायालयाने महापालिकेचे आदेश रद्द करत या कुटुंबियांना दिलासा दिला आहे. जलवाहिनीमुळे बाधित झालेल्या कुटुंबियांना कुर्ल्यातील कोहिनूर वसाहतीत स्थलांतरीत करण्यात आलं होतं. 

नव्या घराच्या चाव्याही मुख्यमंत्र्यांच्या हस्ते त्यांच्याकडे सुपूर्द करण्यात आल्या होत्या. मात्र, महानगरपालिकेने ही घरं खाली करण्याची नोटीस बजावली आणि त्यांना माहूल इथं जाण्यास सांगितलं. 

याविरोधात पीडितांनी न्यायालयात धाव घेतली. यावर न्यायालयाने त्यांना दिलासा देत, माहूलला हलविण्याचे आदेश रद्द केले आहेत. पीडितांनी गुरुवारी गृहनिर्माणमंत्री प्रकाश मेहता यांच्याविरोधात मोर्चाही काढला होता. झी 24 तासने हा मुद्दा समोर आणला होता. त्यामुळे नागरिकांनी झी 24 तासचे आभार मानले.