मुंबईकरांना दिलासा, रिक्षा, टॅक्सीची भाडेवाढ नाही

सर्वसामान्यांना मोठा दिलासा

Updated: Aug 8, 2018, 12:51 PM IST
मुंबईकरांना दिलासा, रिक्षा, टॅक्सीची भाडेवाढ नाही  title=

मुंबई : रिक्षा आणि टॅक्सीच्या भाड्यात लवकरच दोन रुपयांनी वाढ होणार या बातम्यांच्या पार्श्वभूमीवर मुंबई ग्राहक पंचायतीने परिवहन मंत्री दिवाकर रावते यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान भाडेवाढीचा कुठलाही विचार नसल्याचं रावते यांनी स्पष्ट केलं. या बैठकीला परिवहन सचिव आणि परिवहन आयुक्तसुद्धा उपस्थित होते. परिवहन मंत्र्यांनी खुलासा केल्यानंतर मुंबईकरांना दिलासा मिळाला आहे.