फोनवर बोलणं पुन्हा महागणार...'या' कंपन्यांचे प्लान्स बदलणार

तुम्हीही 'या' कंपन्यांचे यूझर असाल तर तुम्हालाही मोठा झटका बसेल.

Updated: May 25, 2022, 09:41 AM IST
फोनवर बोलणं पुन्हा महागणार...'या' कंपन्यांचे प्लान्स बदलणार title=

मुंबईः सर्वसामान्यांना महागाईची झळ बसत असताना आता आणखी एक झटका बसणार आहे. खासगी टेलिकॉम कंपन्या आता प्रीपेड प्लान्स वाढवणार असून त्यामुळे आता मोबाईलवर बोलणंही महागणार आहे.

भारतातील खासगी टेलिकॉम कंपन्या दिवाळीपर्यंत प्रीपेड टॅरिफ प्लान्स 10% ते 12% वाढवू शकतात. ही दरवाढ ऑक्टोबर किंवा नोव्हेंबर 2022 पर्यंत होऊ शकते.

या खासगी टेलिकॉम कंपन्यांमध्ये Airtel, Jio आणि Vi या कंपन्यांचा समावेश आहे.  त्यामुळे तुम्हीही या कंपन्यांचे यूझर असाल तर तुम्हालाही मोठा झटका बसेल.

तज्ज्ञांकडून असं बोललं जात आहे की, टेलीकॉम कंपन्या प्रीपेड प्लान्समध्ये आणखी 10%-12% दरवाढ करतील.

भारती एअरटेल, जिओ आणि Vi चे एवरेज रेवेन्यू पर यूजर ( ARPU) अनुक्रमे रु. 200, रु. 185 आणि रु. 135 पर्यंत वाढवू शकतात.