ठाणेकरोंना, आता पाण्यात तरंगत्या हॉटेलमध्ये अनुबवा स्वादिष्ट पदार्थ

ठाणे पालिका व महाराष्ट पर्यटन विभाग यांच्या विद्यमानाने हे पाण्यावरील तरंगते करुझ हॉटेल साकारण्यात येणार आहे. गायमुख येथे या तरंगत्या हॉटेलमधून एकबाजूला  खाडी आणि दुसऱ्या बाजूला डोंगराळ भाग असं नयनरम्य दर्शन होणार असून, या संकल्पनेतून पर्यटनस्थळांना नवा लूक देण्यात येणार आहे.  

Updated: Jul 6, 2021, 09:28 AM IST
 ठाणेकरोंना, आता पाण्यात तरंगत्या हॉटेलमध्ये अनुबवा स्वादिष्ट पदार्थ title=

मुंबई : ठाण्यात गायमुख खाडीत "तरंगते हॉटेल" ही संकल्पना लवकरच सुरु होणार आहे.  त्यामुळे ठाणेकरांना आता पाण्यावर तरंगत्या  हॉटेलमध्ये सुंदर खाण्याची  मेजवानी अनुभवता येणारेय..सध्या कोरोनामुळे 50 टक्के क्षमतेने हॉटेल सुरू करण्याचा निर्णय घेण्यात येणारेय.. त्यासाठी एक जेट्टी दाखल झाली असून सुसज्ज अशी  व्यवस्था करण्यात आली...प्रायवेट पार्टी देखील करता येणार आहे.

 निसर्गरम्य वातावरण हिरवीगार डोंगराळ रांग व  निळसर पाण्याची खाडी आणि त्यासोबत जेवणाची व संगीताची मेजवानी. हे सुख अनुभवण्यासाठी ठाणेकरांना आता  बाहेर जाण्याची गरज नाही. ठाणेकरांना आता पाण्यावर तरंगत या हॉटेलची मेजवानी अनुभवता येणार आहे.  ठाण्याच्या गायमुख खाडीजवळ हे तरंगते हॉटेल सुरू होणार  आहे. सध्या कोरोनामुळे 50 टक्के क्षमतेने हॉटेल सुरू करण्याचा निर्णय घेण्यात येणार आहे, त्यासाठी एक जेट्टी दाखल झाली असून सुसज्ज अशी व्यवस्था करण्यात आली आहे. 

गोव्याप्रमाणेच महाराष्ट्रातही पर्यटनाला चालना देण्यासाठी मुंबईत पहिल्या तरंगत्या हॉटेलचं संकल्पना मांडण्यात आली होती. ही संकल्पना मुंबईमध्ये अंमलात आणली  होती. मात्र लॉकडाऊन आणि निर्बंधामध्ये या तरंगत्या हॉटेलची सफर बंद करण्यात आली होती. मात्र आता ठाण्याच्या गायमुख खाडीजवळ सुरुवात होणार असून  ठाणेकरांना आगळा वेगळा अनुभव घेता येणार आहे. 
ठाणे पालिका व महाराष्ट पर्यटन विभाग यांच्या विद्यमानाने हे पाण्यावरील तरंगते करुझ हॉटेल साकारण्यात येणार आहे. गायमुख येथे या तरंगत्या हॉटेलमधून एकबाजूला  खाडी आणि दुसऱ्या बाजूला डोंगराळ भाग असं नयनरम्य दर्शन होणार असून, या संकल्पनेतून पर्यटनस्थळांना नवा लूक देण्यात येणार आहे.

द.सी.फ्लोटिंग रेस्टॉरेंट या खासगी कंपनीने हे हॉटेल सुरू केले असून महाराष्ट्र शासनाने ही संकल्पना मांडली आहे. एकीकडे चौपाट्यांचा विकास करण्याचा बिग बजेट  प्रकल्प हाती असतानाच ठाण्यातील गायमुख खाडीत तरंगणारे हॉटेल ठाणेकरांना आणि पर्यटकांसाठी खुले करण्यात येणार आहे.

 महाराष्ट्र मेरिटाईन बोर्डने परवानगी दिली असून या जहाजमध्ये सध्या तरी 100 पर्यटक बसू शकतात. ठाण्यात प्रथमच खाडीकिनारी फ्लोटिंग रेस्टॉरेंट अशी नवीन  संकल्पना अंमलात येत आहे. तसेच यामध्ये पर्यकटकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने लाईफ गार्ड, सुरक्षा रक्षक, सीसीटीव्ही कॅमेरे तसेच अनेक सोयीसुविधा उपलब्ध करण्यात  आली आहे.