ठाण्याच्या महापौरांचा ऍक्सिस बँकेला दणका

अमृता फडणवीस आणि शिवसेना यांच्यातील वादात ऍक्सिस बँकेला दणका

Updated: Dec 27, 2019, 11:18 AM IST
ठाण्याच्या महापौरांचा ऍक्सिस बँकेला दणका  title=

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून ट्विटरवरून CM Uddhav Thackeray मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना लक्ष्य करणाऱ्या विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) यांना धक्का देण्याची तयारी ठाकरे सरकारनं सुरू केल्याची चर्चा आहे. ठाणे महापालिकेच्या कर्मचाऱ्यांचे पगार ऍक्सिस बँकेतून काढून घेतली आहेत. शिवसेनेने ऍक्सिस बँकेला खूप मोठा धक्का दिला आहे. 

ठाणे महापालिकेतल्या सर्व कर्मचाऱ्यांची एक्सिस बँकेतील सॅलरी अकाऊंट आता राष्ट्रीयकृत बँकेत नेणार असल्याची घोषणा कली आहे. महापौर नरेश म्हस्के यांनी हा निर्णय घेतला. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस आणि शिवसेना यांच्यातील वादात ऍक्सिस बँकेला दणका बसला आहे. (माजी मिसेस मुख्यमंत्र्यांना धक्का देण्याची ठाकरे सरकारची तयारी) 

 

 ठाणे महापालिकेच्या कर्मचाऱ्यांची ऍक्सिस बँकेतील खाती इतर सरकारी बँकांमध्ये वळवण्याचे आदेश ठाण्याचे महापौर नरेश म्हस्के यांनी दिले आहेत. अमृता फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कारभारावर टीका केली होती. त्यानंतर महाराष्ट्रातील पोलीस कर्मचाऱ्यांची ऍक्सिस बँकेतली खाती इतर बँकांमध्ये वळवण्यात येणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. या पार्श्वभूमीवर ठाणे महापालिकेनं हा निर्णय घेतला आहे. 

पोलीस कर्मचाऱ्यांची ऍक्सिस बँकेतील खाती राष्ट्रीयकृत बँकेत वळवण्याचा निर्णय ठाकरे सरकारकडून लवकरच घेतला जाण्याची शक्यता आहे. ऍक्सिस बँकेत पोलिसांची दोन लाख खाती आहेत. वर्षाकाठी जवळपास ११ हजार कोटी रुपये बँकेत जमा होतात. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना पोलिसांची खाती अँक्सिस बँकेत वळवण्यात आली होती. फडणवीस यांच्या पत्नी ऍक्सिस बँकेत वरिष्ठ पदावर कार्यरत आहेत. त्यामुळे सरकारनं आता पोलिसांची खाती दुसऱ्या बँकेत वळवण्याचा निर्णय घेतल्यास अमृता फडणवीसांना मोठा धक्का ठरणार आहे. 

अमृता फडणवीस यांनी २००३ सालापासून ऍक्सिस बँकेमध्ये कार्यरत आहेत. त्यांचा बँकेतला हा प्रवास एक्झिक्युटिव्ह कॅशिअर म्हणून सुरू झाला. सध्या त्या ऍक्सिस बँकेत व्हाईस प्रेसिडेन्ट (corporate head - west india) म्हणून काम पाहत आहेत.