धक्कादायक! बॅंकेत दरोडा घालताना माजी मॅनेजरनेच महिला कर्मचाऱ्याला संपवलं

विरारमध्ये बँकेवर दरोडा पडल्याची धक्कादायक घटना घडली आहे. 

Updated: Jul 30, 2021, 12:50 PM IST
धक्कादायक! बॅंकेत दरोडा घालताना माजी मॅनेजरनेच महिला कर्मचाऱ्याला संपवलं

मुंबई : विरारमध्ये बँकेवर दरोडा पडल्याची धक्कादायक घटना घडली आहे. जवळपास रात्री 8च्या सुमारास हा दरोडा टाकण्याचा प्रयत्न करण्यात आला. आयसीआयसीआय या बँकेमध्ये दरोडा पडला असून आसपासच्या परिसरात एकच खळबळ उडाली. मुख्य म्हणजे दरोडेखोराला पकडलं असता हा दरोडेखोर माजी मॅनेजर असल्याचं समोर आलं आहे.

विरार पूर्वमधल्या स्टेशन परिसरात असणाऱ्या ICICI बँकेत ही घटना घडली आहे. दरम्यान दरोडा घालताना एका महिलेने या माजी मॅनेजरला अडवलं. अडवणूकीनंतर या माजी मॅनेजरने त्या महिला कर्मचाऱ्याची हत्या केली. हल्ल्यात आणखी एक महिला कर्मचारी जखमी झालीय. जखमी महिलेला रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. 

दोन दरोडेखोरांनी हा सशस्त्र दरोडा टाकला. सोने आणि पैशाची बॅग घेऊन फरार होत असताना एका दरोडेखोराला नागरिकांनी पकडून पोलिसांच्या ताब्यात दिलं आहे. 

बँकेतलं सोनं आणि रोख रक्कम लुटून नेण्याचा दोन आरोपींचा प्रयत्न केला आहे. यातील एक बँकेचे माजी मॅनेजरचं आहे. दरोडा घालून पळण्याचा प्रयत्न करताना एका आरोपीला सतर्क नागरिकांनी पकडलं. आरोपीच्या हातातील सोनं आणि पैशाची बॅगही ताब्यात घेऊन नागरिकांनी आरोपी आणि बॅग पोलिसांच्या ताब्यात दिली. 

विरार पोलीस स्टेशनमध्ये आरोपी मॅनेजरविरुद्ध हत्या आणि दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. या घटनेमागील कारणाचा शोध घेण्यासाठी विरार पोलिसांकडून तपास करण्यात येत आहे.