Pornography Case: गेहना वशिष्ठच्या अडचणींमध्ये वाढ; पिडीतेने केले गंभीर आरोप

पोर्नोग्राफी केसमध्ये अडकलेल्या एक्ट्रेस-मॉडेल गेहना वशिष्ठच्या अडचणींमध्ये वाढ झाली आहे. 

Updated: Jul 30, 2021, 08:53 AM IST
Pornography Case: गेहना वशिष्ठच्या अडचणींमध्ये वाढ; पिडीतेने केले गंभीर आरोप

मुंबई : पोर्नोग्राफी केसमध्ये अडकलेल्या एक्ट्रेस-मॉडेल गेहना वशिष्ठ आणि रोवा खान यांच्या अडचणींमध्ये वाढ झाली आहे. या दोघींवरही राज कुंद्रासोबत पोनोग्राफी प्रकरणात आरोप लागले आहेत. पोलिसांच्या जवळच्या सूत्रांनी दोन पीडितांचे जबाब जारी केलेत, ज्यांनी आरोप केला आहे की त्यांना अश्लील व्हिडिओ करण्यास भाग पाडले गेले. दोन्ही मुलींनी मढ बेटावरील एका बंगल्यात व्हिडिओ शूट केल्याचा दावा केला आहे.

या संपूर्ण प्रकरणात, दोन्ही पीडितांनी संपूर्ण प्रकार सांगितला. एका रिपोर्टनुसार, एका पीडित मुलीने रोवा खानवर तिला धमकावण्याचा आणि तिच्यावर दबाव आणल्याचा आरोप केला आहे, तर दुसर्‍या पीडितेने गेहना वशिष्ठवर गंभीर आरोप केले आहेत. तसंच धमकी देऊन त्यांच्यासोबत शारीरिक संबंध बनवल्याचा दावा केला आहे.

या पीडितेच्या म्हणण्याप्रमाणे, "गेहनाने मला सांगितले की त्यांनी मालिकेच्या शूटिंगसाठी 10 लाख रुपये खर्च केले आणि मी सोडल्यास त्या 10 लाखांची भरपाई द्यावी लागेल. मी गेहनाला सांगितले की माझ्याकडे पैसे नाहीत. शूटिंग संपल्यावर मी गेहनाला विनंती केली की मला जाऊ द्या आणि मग तिने मला धमकावले आणि मला सांगितले की या शूटबद्दल कोणाशीही बोलू नका किंवा पोलिसांकडे जाऊ नका, नाहीतर याचे परिणाम वाईट होतील.

दरम्यान सुरक्षेच्या कारणास्तव पोलिसांनी दोन्ही पीडितांची नावे लपवली आहेत. गेहाना वशिष्ठ आणि रोवा खान यांनी पॉर्न फिल्म तयार करण्यासाठी पीडितांना बळजबरीने भाग पाडल्याचा आरोप या विधानांमध्ये करण्यात आलाय. गेहना अद्याप गुन्हे शाखेच्या अधिकार्‍यांसमोर हजर झाली नाही आणि पॉर्नोग्राफी प्रकरणी सुरू असलेल्या तपासात तिचा जबाब नोंदवला आहे.